व्याघ्र प्र्रकल्प कार्यालयाची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:46 PM2018-01-29T22:46:50+5:302018-01-29T22:47:10+5:30
तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकल्यानंतर झालेले दोन वनरक्षक आणि एका वनपालांचे निलंबन परत घ्यावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांप्रति सकारात्मक भूमिका बाळगावी, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक वनकर्मचाऱ्यांनी सोमवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय परिसराची स्वच्छता मोहीम राबविली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकल्यानंतर झालेले दोन वनरक्षक आणि एका वनपालांचे निलंबन परत घ्यावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांप्रति सकारात्मक भूमिका बाळगावी, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक वनकर्मचाऱ्यांनी सोमवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय परिसराची स्वच्छता मोहीम राबविली. गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करून वरिष्ठांचे त्यांनी लक्ष वेधले.
अगोदर अकोट, आता अमरावतीत मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या परिसरात वनकर्मचाºयांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ‘जंगल वाऱ्यावर अन् कर्मचारी संपावर’ अशी अमरावती वनविभागाची स्थिती आहे. काम बंद आंदोलनात प्रामुख्याने वनपाल, वनरक्षकांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. २५ जानेवारीपासून सुरू झालेल्या काम बंद आंदोलनामुळे वन्यजीव, जंगलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तीन कर्मचाºयांचे निलंबन मागे घ्यावे, या वनकर्मचाºयांच्या मागणीला वरिष्ठ वनाधिकाºयांकडून फारसा प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. परंतु, आंदोलनाला कोणतेही गालबोट लागू नये, हे आंदोलन शांतता, अंहिसेच्या मार्गानेच सुरु ठेवण्यावर महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेने जाहीर केले आहे. त्यानुसार सोमवारी स्वच्छता मोहीम राबवून काम बंद ठिय्या आंदोलनाला अभिनव स्वरूप दिले, हे विशेष.
आंदोलनात इंद्रजित बायस्कर, प्रदीप बाळापुरे, अनुप साबळे, राजेश घागरे, प्रवीण सगणे, डी.एम. पोटे, एन.डी. तुपकर, पी.बी. फरतोडे, एस.एस. खराबे, टी.ए. ठाकरे, एस.एच. राठोड, ए.जे. अलोकार, डी.एम. हेरो, एम.एम. ठाकरे, डी.एन. पवार, एस.बी. शेगोकार, एस.आर. काळे, एस.एच. मेटकर, ए.बी. वानखडे, ए.एस. मोरे, ए.जी. चक्रवर्ती, पी,पी. मुंडे, पी.एस. सोगे, व्ही.जी. बनसोड आदी सहभागी झाले आहेत.