स्वच्छता कामगार बडतर्फ, मृदंग टर्मिनेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:38 PM2017-09-18T22:38:51+5:302017-09-18T22:39:05+5:30
वारंवार गैरहजर राहून स्वच्छतेत हयगय करणाºया स्वच्छता कामगारास बडतर्फ करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वारंवार गैरहजर राहून स्वच्छतेत हयगय करणाºया स्वच्छता कामगारास बडतर्फ करण्यात आले. श्रीकांत रमेश गोहर असे बडतर्फ केलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याला यापूर्वी निलंबित केले होते. आयुक्त हेमंत पवार यांनी सोमवारी गोहरच्या बडतर्फीचे आदेश पारित केलेत. याशिवाय मृदंग संस्थेच्या स्वच्छता कंत्राटदाराला टर्मिनेट करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
१३ आॅगस्ट २०१६ पासून गोहर हे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अथवा रजेचा अर्ज न देता सतत गैरहजर होते. त्याबाबत त्यांना स्वास्थ्य निरीक्षकांकडून खुलासा मागविण्यात आला. त्यानंतर त्यांना ७ आॅक्टोबर २०१६ रोजी निलंबित करण्यात आले व दोषारोपत्र बजावण्यात आले. मात्र त्यांनी दिलेला खुलासा असमाधानकारक असल्याने सोमवारी आयुक्त हेमंत पवार यांनी गोहर यांना महापालिका सेवेतून बडतर्फ केले आहे. अन्य काही कामगारांवरही कारवाईची तलवार राहणार आहे.
मृदंगवर १४ दिवसांनंतर कारवाई
जवाहर गेट प्रभागातील स्वच्छता कंत्राटदार मृदंग मागासवर्गीय बेरोजगार संस्थेला ब्लॅकलिस्ट करुन टर्मिनेट करण्याबाबतचे निर्देश आयुक्त हेमंत पवार यांनी ४ सप्टेंबरला दिले होते.मात्र मृदंगच्या पाठीमागे चार नगरसेवक भक्कमपणे उभे राहिल्याने कारवाईत अडसर निर्माण झाला होता.मात्र त्या दबावाला न झुकता सोमवारी ‘मृदंग’ला टर्मिनेट करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तब्बल चौदा दिवसानंतर ही कारवाई करण्यात आली.