आयएमएचा बंद; रुग्णसेवा प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:31 AM2019-08-01T01:31:40+5:302019-08-01T01:32:33+5:30
केंद्र सरकारने लोकसभेत संमत करून घेतलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास विरोध करून इंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी देशव्यापी बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने अमरावती येथेही साडेचारशे रुग्णालयांचा ओपीडी कक्ष बुधवारी सकाळी ६ पासून २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र सरकारने लोकसभेत संमत करून घेतलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास विरोध करून इंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी देशव्यापी बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने अमरावती येथेही साडेचारशे रुग्णालयांचा ओपीडी कक्ष बुधवारी सकाळी ६ पासून २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता. केवळ अत्यवस्थ रुग्णांची तपासणी रुग्णालयात करण्यात आली.
आयएमएचे अमरावती शाखेचे सर्व सदस्य आंदोलनात सहभागी झाले. आयएमए हॉल येथे झालेल्या एका सभेत अध्यक्ष डॉ. अशोक लांडे यांनी या अन्यायकारक विधेयकाला विरोध असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे यांनी त्यासंबंधी सविस्तर माहिती दिली. यावेळी आयएमए महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. उद्धव देशमुख, माजी उपाध्यक्ष डॉ. वसंत लुंगे, डॉ. पुष्पा थोरात, डॉ. जागृती शहा, डॉ. पंकज बागडे, डॉ. आशिष डागवार, डॉ. सुरेश सावदेकर, डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. संगीता कडू तसेच डॉ. मंजूश्री बूब यांनी विचार मांडले. अध्यक्ष डॉ. अशोक लांडे, सचिव डॉ. निरज मुरके, नियोजित अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर, कोषाध्यक्ष डॉ. आशिष साबू, डॉ. उद्धव देशमुख, डॉ. वसंत लुंगे, डॉ. सुरेश सावदेकर, डॉ. पुंशी, डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. मोना आडतिया, डॉ. सविता पाटणकर, डॉ. सोमेश्वर निर्मल, डॉ. वैजयंती पाठक, डॉ. उल्हास संगई, डॉ. गोपाल बेलोकार, डॉ. प्रवीण व्यवहारे, डॉ. शुभांगी मुंधडा, डॉ. ओ.जी. मुंधड़ा, डॉ. धीरज सवाई, डॉ. कल्पना लांडे, डॉ. मनोज गुप्ता, डॉ. राजन पुंडकर, डॉ. संदीप दानखडे, डॉ. तृप्ती दानखडे, डॉ. स्वप्निल शिरभाते, डॉ. नीलिमा ठाकरे, डॉ. शीतल पोटोडे, डॉ. अनुपम राठोड, डॉ. अजय डफळे, डॉ. राजेंद्र ढोरे, डॉ. नितीन सेठ, डॉ. जयंत पांढरीकर, डॉ. तानाजी अर्डक, डॉ. अनिल हरवानी, डॉ. ऋषीकेश नागलकर, डॉ. अनुराधा काकाणी, डॉ. संगीता साळुंके, डॉ. आरती मुरके, डॉ. विजय लेवटे, डॉ. अमित कविमंडन, डॉ. धवल तेली, डॉ. समीर चौधरी, डॉ. रश्मी कहार, डॉ. राजेंद्र गणेडीवाल, डॉ. स्वाती शिंदेकर, डॉ. प्रफुल जैस्वाल, डॉ. अद्वैत पानट, डॉ. विनीत साबू, डॉ. विद्युत खांदेवाले, डॉ. किशोर बेले, डॉ. पवन ककरानिया, डॉ. भूपेश भोंड, डॉ. संदीप मलिये, डॉ. सिकंदर आडवाणी, डॉ. राजेश बूब, डॉ. अंजली खोंड, डॉ. भूषण मुरके, डॉ. अभिजित देशमुख, डॉ. प्रल्हाद पाटील, डॉ. गणेश काळे, डॉ. स्वप्निल खोंड, डॉ. मानसी कविमंडन, डॉ. पंकज बागडे, डॉ. दिनेश वाघाडे आदी सभासद सभेत उपस्थित होते.
आयएमएच्या कडकडीत बंदमुळे अमरावतीतील सर्वच रुग्णालये बंद राहिली. अत्यावश्यक रुग्णसेवा वगळता इतर सेवा प्रभावित झाली. शहरातील सर्वच डॉक्टरांच्या सहभागामुळे बंद यशस्वी ठरला.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास विरोध दर्शविण्यासाठी इंडियन मेडिकल असंोसिएशनच्या अमरावती शाखेतर्फे सर्व डॉक्टरांनी ओपीडी सेवा बंद ठेवून बंद यशस्वी केला. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा सुरू ठेवली होती.
- मनोज निचत
हृदयरोगतज्ज्ञ