‘सोफिया’चे पाणी तीन महिने बंद करा

By admin | Published: May 9, 2016 12:15 AM2016-05-09T00:15:32+5:302016-05-09T00:15:32+5:30

राज्यासह विदर्भातही पाणीटंचाईचा भीषण प्रश्न उदभवला आहे.

Close the water of 'Sofia' for three months | ‘सोफिया’चे पाणी तीन महिने बंद करा

‘सोफिया’चे पाणी तीन महिने बंद करा

Next

युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक : जलसंपदामंत्र्यांना मागण्यांच्या पूर्ततेसाठी साकडे
अमरावती : राज्यासह विदर्भातही पाणीटंचाईचा भीषण प्रश्न उदभवला आहे. विशेषत: अमरावती व बडनेरा शहराला पाणीटंचाई जाणवत असल्याने नांदगाव पेठ येथील सोफिया औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाला दिले जाणारे पाणी तीन महिन्यांपर्यंत बंद करण्यात यावे, अशी मागणी आ. रवि राणाद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने जलसंपदामंत्र्यांकडे करण्यात आली.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ‘सोफिया’त पाणी पुरवठ्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याची कैफियत त्यांच्या पुढ्यात मांडली. मे महिन्यात भीषण पाण टंचाई भासणार असल्याने तत्पूर्वी उपाययोजना म्हणून सोफियाला दिले जाणारे पाणी पुढील तीन महिने पर्यत बंद करुन पिण्याचे पाण्याला प्राधान्य द्यावे, असे युवा स्वाभिमानने पत्राद्वारे कळविले आहे. जिल्ह्यात निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना चारपट मोबदला देण्यात यावा, गावांचे पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात यावे, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात भूधारकांना लागू केलेला २ चा गुणक शासनाने अमरावतीत लागू करावा, भूधारक व शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी २०१३ च्या कायद्यानुसार २ चा गुणक लागू करावा, भातकुली तालुक्यात कुंड या गावाचे पुनर्वसनचे ले-आऊट तयार झाले असून येथे नागरी सुविधा उपलब्ध करून द्यावा, नागरी सुविधा मिळेपर्यंत महसूल विभागाने भूखंडाचे वाटप करू नये, असे पत्राद्वारे कळविले आहे. पेढी प्रकल्पात ज्या गावांत सहामाही बागायती करण्यात आल्यात त्या गावांना बागायती शेतीचे भाव निश्चित करावे. सिंचनाचे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत, ते त्वरने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. गाव पुनर्वसन करून ग्रामस्थांना न्याय प्रदान करावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उमेश ढोणे, अभिजित देशमुख, अंकुश ठाकरे, मंगेश कोकाटे, अजय बोबडे, ज्ञानेश्वर कळसकर, बबलू दुर्गे, मंगेश इंगोले, भूषण माने, बाळासाहेब दातीर, मयूर माहोरे, विनोद पटवेकर, अमोल इंगोले आदी उपस्थित होते.

Web Title: Close the water of 'Sofia' for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.