बंद पॅसेंजर गाड्या गुरुवारपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:56 PM2019-07-16T23:56:16+5:302019-07-16T23:56:37+5:30

भुसावळ-नागपूर मार्गावर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या १० पॅसेंजर फेऱ्या गुरुवार, १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. खासदार नवनीत रवि राणा यांच्या सततच्या पाठपुराव्याने रेल्वे मंत्रालयाने गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Closed passenger trains run from Thursday | बंद पॅसेंजर गाड्या गुरुवारपासून धावणार

बंद पॅसेंजर गाड्या गुरुवारपासून धावणार

Next
ठळक मुद्देअडीच महिन्यानंतर जाग : नवनीत राणांच्या पाठपुराव्याला यश, रेल्वे बोर्डाने पत्र काढले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भुसावळ-नागपूर मार्गावर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या १० पॅसेंजर फेऱ्या गुरुवार, १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. खासदार नवनीत रवि राणा यांच्या सततच्या पाठपुराव्याने रेल्वे मंत्रालयाने गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर-भुसावळ मार्गाचे काम करण्याच्या नावाखाली १० फेºया पॅसेंजरच्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दैनदिन रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांनी खासदार राणा यांची भेट भेटली. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने गरीब, सामान्य प्रवाशांचे होत असलेले हाल आणि आपबीती कथन केली. त्यानुसार खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे बंद केलेल्या सर्व पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली. रेल्वे बोर्डाने मंगळवारी अधिकृत पत्र जारी करून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. १८ जुलैपासून पुन्हा पॅसेंजर धावणार आहे. नागपूर-भुसावळ (५१२८५) ही जुलै रोजी सुरू होईल. नागपूर-वर्धा (५१२६०) ही पॅसेजर १८ जुलै रोजी धावणार आहे.तर भुसावळ - नागपूर (५१२८५) ही पॅसेंजर १९ जुलै रोजी सुटेल. भुसावळ-वर्धा (५११९७), वर्धा- भुसावळ (५११९८) ही १८ जुलै रोजी धावणार आहे. पॅसेंजर सुरू होत असल्याने सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या पॅसेंजर सुरू होतील
नागपूर-भुसावळ (५१२८६), भुसावळ-नागपूर (५१२८५), नागपूर-वर्धा (५१२६०), वर्धा- नागपूर (५१२५९), वर्धा-अमरावती (५१२६१), अमरावती-वर्धा (५१२६२), अजनी-काजीपेठ (५७१३५), काजीपेठ-अजनी (५७१३६), भुसावळ-वर्धा (५११९७), वर्धा-भुसावळ (५११९८)
प्रवासी संख्येत घट; उत्पन्न कायम
अडिच महिन्यापासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दरमहा १० ते १२ हजार प्रवासी घटले आहेत. मात्र, रेल्वेच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती एका वाणिज्य विभागातील अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पॅसेंजर गाड्या बंद असल्या तरी एक्स्प्रेस व अन्य रेल्वे गाड्यांनी नागरिक प्रवास करतात. यंदा जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्या १४ हजारांनी रोडावल्याचा अहवाल बडनेरा रेल्वे स्थानकाच्या वाणिज्य विभागाने वरिष्ठांकडे पाठविला होता.

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पॅसेंजर सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले होते. पॅसेंजर बंद असल्यामुळे गरीब, सामान्य प्रवाशांचे होणारे हाल आणि आर्थिक नुकसानाची माहिती दिली होती. मंगळवारी रेल्वे बोर्डाने पॅसेंजर सुरू करुन गरीब प्रवाशांना न्याय दिला आहे.
- नवनीत रवि राणा
खासदार, अमरावती.

पॅसेंजर गाड्यांमुळे लहान, मोठ्या रेल्वे स्थानकावर कमी पैशात ये-जा करणे सुकर होते. मात्र अडिच महिन्यापासून पॅसेंजर गाड्या बंद होत्या. त्या पूर्ववत झाल्याने दिलासा मिळाला.
- रोशन चव्हाण, रेल्वे प्रवासी, बडनेरा.

Web Title: Closed passenger trains run from Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.