अमरावती बाजार समितीमध्ये अडते, खरेदीदारांचे व्यवहार आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 09:41 PM2018-08-28T21:41:01+5:302018-08-28T21:41:24+5:30
शासनाने बाजार समित्यांमध्ये शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याचे धोरण आणले आहे. या कायद्यातील जाचक अटीविरोधात अडते व खरेदीदारांनी बुधवार, २९ आॅगस्टला एका दिवस व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवावे या मागणीचे निवेदन बाजार समितीचे प्र-सभापती नाना नागमोते यांना मंगळवारी देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाने बाजार समित्यांमध्ये शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याचे धोरण आणले आहे. या कायद्यातील जाचक अटीविरोधात अडते व खरेदीदारांनी बुधवार, २९ आॅगस्टला एका दिवस व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवावे या मागणीचे निवेदन बाजार समितीचे प्र-सभापती नाना नागमोते यांना मंगळवारी देण्यात आले.
राज्य शासनाने मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाप्रमाणे जे व्यापारी व खरेदीदार हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये एक वर्षाचा कारावास व किमान ५० हजारांचा दंड, अशी तरतूद केलेली आहे. अडते व खरेदीदार हे बाजार समितीचे परवानाधारक आसल्याने शासनाने जर अशा प्रकारचा निर्णय घेतला असल्यास हा निर्णय कळविण्याची जबाबदारी बाजार समितीची असल्याचे अडते व खरेदीदारांचे निवेदनात नमुद आहे. लगतच्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बंद पाळला जात असल्याने खरेदीदारांमध्ये संभ्रम असल्याचे निवेदनात नमूद आहे. शेतकऱ्यांनी बुधवारी बाजार समितीत शेतमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
सध्या शासनाकडून कोणताही आदेश आलेला नाही किंवा अधिसुचना देकील प्राप्त झालेली नाही. केवळ माध्यमातील बातम्यामुळे हा संभ्रम निमारण झालेला आहे. बाजार समितीमदील व्यवहार बंद राहनार असल्याने शेतकºयांनी बुधवारी शेतमाल विक्रीस आणू नये.
- नाना नागमोते,
प्र-सभापती, बाजार समिती