धामणगावात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:38 AM2018-01-05T01:38:05+5:302018-01-05T01:38:21+5:30

कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी धामणगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी व्यापारी व दुकानदारांनीसुद्धा आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली.

Closing | धामणगावात कडकडीत बंद

धामणगावात कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देकोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी धामणगावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी धामणगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी व्यापारी व दुकानदारांनीसुद्धा आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली.
धामणगाव रेल्वे येथे भीमशक्तीच्यावतीने शहर बंदचे आवाहन गुरुवारी करण्यात आले होते. सकाळपासूनच सर्व शैक्षणिक प्रतिष्ठाने स्वयंफूर्तीने बंद ठेवण्यात आली, तसेच बाजारपेठांसह सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने उघडली नाही. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेकडोंच्या संख्येने भीम अनुयायी घोषणा देत नगरपालिका कार्यालयात गोळा झाले. त्यांनी नगरपालिकेपासून शहराच्या मुख्य मार्गाने निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मोर्चेकºयांच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत मोर्चा तहसील कार्यालयाजवळ पोहचला. शहरातील नेत्यांच्या भाषणानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. बंद दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तगडा पोलीस बंदोबस्त
चौकाचौकांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. दत्तापूरचे ठाणेदार अशोक लांडे यांनी अमरावतीहून अतिरिक्त कुमक बोलावली होती. याशिवाय आरसीपी डिव्हीजनमधून अधिकारी व कर्मचाºयांनासुद्धा बोलाविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी राऊतसुद्धा धामणगावात ठाण मांडून होते.
मोर्चामुळे रेल्वेही प्रभावित
शहराच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे फाटकामुळे दोन भागांत विभागलेल्या धामणगाव शहरातील रेल्वे फाटकाजवळ भीमशक्तीचा मोर्चा पोहोचला असताना, मोर्चेकऱ्यांनी रेल्वे रुळावरच निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे विभागाने आधीच रेल्वे रुळांवर रेल्वे सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलिसांचा अतिरिक्त ताफा हजर केला होता. त्यांनी आंदोलकांना थोपविले. उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत राऊत, दत्तापूरचे ठाणेदार अशोक लांडे, वर्धा व बडनेरा रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस आणि बडनेरा जीआरपीचे सहायक निरीक्षक नांगरे यांनी सतर्कतेने परिस्थिती हाताळली. या घटनाक्रमात जबलपूर एक्स्प्रेस पुलगाव येथे २० मिनिटे थांबविण्यात आली, तर तळणी येथे महाराष्ट्र एक्स्प्रेस १५ मिनिटे थांबविण्यात आली होती. रेल्वे विभागाचे कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

Web Title: Closing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.