कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:04 AM2019-09-17T00:04:10+5:302019-09-17T00:04:55+5:30
काम बंद आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी १० टक्क्यांप्रमाणे मानधन वाढ देण्यात यावी, अभ्यास समिती सभेत ठरल्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकूण गुणांच्या ३ टक्के ते ३० टक्के असा इतीवृत्तामध्ये बदल करून याबाबत शासननिर्णय काढण्यात यावा, सध्या कार्यरत असलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना कमी केले जाऊ नये, एनआरएचएम बंद करण्यात येऊ नये आदी मागण्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासन व प्रशासनाच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, एनआरएचएममधील कंत्राटी व कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांना मागण्यांचे निवेदन सोपविले.
काम बंद आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात मागील दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी १० टक्क्यांप्रमाणे मानधन वाढ देण्यात यावी, अभ्यास समिती सभेत ठरल्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकूण गुणांच्या ३ टक्के ते ३० टक्के असा इतीवृत्तामध्ये बदल करून याबाबत शासननिर्णय काढण्यात यावा, सध्या कार्यरत असलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना कमी केले जाऊ नये, एनआरएचएम बंद करण्यात येऊ नये आदी मागण्या आहेत. दुसरा कुठला उपक्रम सुरू केल्यास त्यामध्ये याच कर्मचाºयांचे समायोजन करावे, अन्यायकारक बेंच मार्क सिस्टीम लागू करू नये, दहा वर्षे झालेल्यांची बदली करण्यासाठी तात्काळ आदेश काढावा, शासकीय सेवेत कायम करावे अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. यासंदर्भात १६ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या नलिनी बोरकर, कुंदा वानखडे, प्रीती पवार, लता मोहोड, स्वाती बनसोड, पुष्पा वाळवे, योगिनी तेलंग, प्रफुल्ल रिधोरे, रूपेश सरदार, शशिकांत तभाने, प्रसाद अनासाने यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.