सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात ‘वंचित’चा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:01:03+5:30
जिल्हाभरात बंदला संमिश्र प्रतिसाद : उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना ठिकठिकाणी निवेदने, विविध संघटनांचा सहभाग अमरावती : नागरिकत्व दुरुस्ती कायदा एनआरसी ...
जिल्हाभरात बंदला संमिश्र प्रतिसाद : उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना ठिकठिकाणी निवेदने, विविध संघटनांचा सहभाग
अमरावती : नागरिकत्व दुरुस्ती कायदा एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. अचलपूर, दर्यापूर, धामणगाव, तिवसा, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, धारणी येथे तहसीलदार व एसडीओंना निवेदन देण्यात आले. अमरावती तालुक्याच्या मुख्यालयी वंचितच्या मोर्चाला गालबोट लागले.
धामणगाव कडकडीत बंद
धामणगाव रेल्वे : सीएए, एनपीआर, एनआरसी या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या भारत बंदला धामणगाव तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. आपत्कालीन व्यवस्था वगळता शैक्षणिक प्रतिष्ठानांसह कडेकोट बंद पाळण्यात आला. तालुक्यातील मुस्लिम बांधवांनीदेखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
निवेदन देतेवेळी बहुजन वंचित आघाडीचे अशोक मोहोड, राजेंद्र बोरकर, मुकुंद रंगारी, सरफराज खान, ज्ञानेश्वर शिंगणापुरे, शुभम हेंडवे, मंगेश तायडे, सुभाष डोंगरे, प्रवीण कातळ, संतोष मेश्राम, कैलास डोके, आशिष गावंडे, जीवन बोरकर, सुनील पाटील यांच्यासह शेकडो जण सहभागी झाले.
तिवसा येथे सीएएला विरोध
तिवसा : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी तिवस्यात बंद पाळण्यात आला. बंदला तिवसेकर व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. यात डी.एच. मेश्राम, दीपक सरदार, सागर भवते, सतीश यावले, अनिल सोनोने, राहुल मनवर, प्रवीण निकाळजे, संदीप मकेश्वर, राहुल गोपाळे, बबलू मुंद्रे, भगवान बनसोड, मनोज लांडगे, सागर लांडगे, सम्यक हगवणे, नीलेश गवई, मनीष खरे, दादाराव गडलिंग, गुणवंत ढोणे, भीमराव पाहुणे, रोशन खडसे, नीलेश गवई, निखिल वानखडे, सुदर्शन शापामोहन, दिनेश शेंदरे, राजू शापामोहन, अभिषेक मनोहरे, निखिल आसोडे, भूजंगराव वावरे सहभागी झाले.
दर्यापुरात संमिश्र प्रतिसाद
दर्यापूर : वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला येथे व्यापक प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व शाळा-महाविद्यालये पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. नगरपालिका इमारतीपासून मोर्चा काढण्यात आला. त्यात साहेबराव वाकपांजर, विजय चौरपगार, अशोक नवलकार, अतुल नळकांडे, सदानंद नागे, संजय चौरपगार, अंकुश वाकपांजर, भीमराव कुºहाडे, जॅकी अहमद, रेखा वाकपांजर, माधुरी चौरपगार, संजीवन खंडारे, संतोष बगाडे, सुमेध खंडारे, अनिरुद्ध वानखडे, धर्मेंद्र आठवले, रुपराव तिडके, चेतन कांबळे, संदीप सुशिर, राजकुमार सावळे आदी सहभागी होते.
चांदूर रेल्वे बंदमध्ये ३५ संघटना
चांदूर रेल्वे : सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात चांदूर रेल्वे शहरात शांततेत पण कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी १० पासून स्थानिक व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. येथील वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी व सम्यक विद्यार्थी आघाडीच्यावतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर सभा घेण्यात आली. सभेला दादासाहेब घुरडे, चंदू उके, रवींद्र मेंढे, मुकुल परगणे, प्रेमचंद अंबादे, प्रवर्ज्या चवरे, सुरेश गोरडे, अशोक हांडे, सुनील वानखडे, अजय राऊत उपस्थित होते.
चांदूरबाजार, वरूड, धारणीमध्ये निवेदन
चांदूर बाजार, धारणी व वरूड शहरांत वंचित बहुजन आघाडीमार्फत उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. सीएए, एनपीआर, एनआरसीला विरोध दर्शवून ते कायदे मागे घेण्यात यावे, आम्ही कुठल्याही परिस्थितीत कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असा पवित्रा वंचित व सहभागी अन्य संघटनांनी घेतला आहे.
अचलपुरात मोर्चा
परतवाडा : अचलपूर, परतवाड्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सीएए व एनआरसी कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गांधीपूल, तहसील, जयस्तंभ चौकमार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी एसडीओ संदीप अपार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. मोर्चात सतीश इंगोले, अमोल खंडारे, रवी वानखडे, बळवंत गाठे, संजय शिंगाडे, इमरान खान, पुंडलिक वानखडे, गजानन वाकोडे, हाजी मो.इरफान, राहुल कडू, सिद्धार्थ इंगळे, मनीष गवई, अब्दुल राजीक, अक्षय रौराळे, आदी सहभागी होते.