अमरावती तालुक्यातील १४ गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 13:58 IST2023-07-21T13:52:04+5:302023-07-21T13:58:22+5:30
हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली : सोयाबीन, कपाशी पीक खरडून गेले

अमरावती तालुक्यातील १४ गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस
अमरावती : अमरावती तालुक्यातील नांदुरा, शिरळा, पुसदा परिसरात गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे सुमारे १४ गावांमधील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली. सोयाबीन, कपाशी पीक खरडून गेले. परिसरातील पेढी नदीसह सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहिले. शिराळनजीकच्या पावसामुळे अमरावती-चांदूर बाजार मार्गातील पूल काही वेळेसाठी पाण्याखाली गेला होता.
विजेच्या तडाख्याने १५ बकऱ्या ठार
तिवसा (अमरावती) : जुनी भारवाडी शिवारात वर्धा नदीलगत वीज कोसळून १५ बकऱ्या दगावल्याची घटना गुरुवारी दुपारी २:३५ च्या सुमारास घडली. यात चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या बकऱ्यांचा कळप वर्धा नदीलगत चरत होता. अशातच विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वीज कोसळताच काही कळायच्या आतच पंधराही बकऱ्या जागीच ठार झाल्या.
धर्मराज गेडाम यांच्या आठ, सुरेश निंघोट यांच्या पाच, प्रफुल कराळे व घनश्याम कडू यांच्या प्रत्येकी एका बकरीचा जीव गेला. या पशुपालकांचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी, तलाठी यांनी नोंद घेतली. तिवसा येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. परीक्षित कातखेडे यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले.