वाहने तोडणारे हुडकून काढण्यासाठी ‘कोम्बिंग

By admin | Published: February 16, 2016 12:14 AM2016-02-16T00:14:56+5:302016-02-16T00:14:56+5:30

अमरावती शहर गाड्या तोडण्याचे ‘हब’ झाले असून अशा बेलगाम व्यवसायावर लगाम कसण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले.

'Cobbling' to break the vehicles | वाहने तोडणारे हुडकून काढण्यासाठी ‘कोम्बिंग

वाहने तोडणारे हुडकून काढण्यासाठी ‘कोम्बिंग

Next

रणजित पाटील : वाहतूक नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजनेवर भर
अमरावती : अमरावती शहर गाड्या तोडण्याचे ‘हब’ झाले असून अशा बेलगाम व्यवसायावर लगाम कसण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले.
शहरातील वाहतूक व्यवस्थाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी उपस्थित आयुक्तांना त्यांनी दीर्घ उपाययोजना राबविण्याच्या सूचनासुद्धा केल्या. शाळा आणि महाविद्यालय आयडेंटीफाय करून शाळेच्या वेळेत जड वाहने तर नकोच, असे आपले मत असून जीव अधिक महत्त्वाचा आहे. नियंत्रित वाहतूक व्यवस्थेसाठी काही वळणमार्ग सुचविले आहेत. वाहतुकीची जबाबदारी निश्चित करुन भीडमुर्वत न ठेवता कारवाई करण्याचे निर्देश आपण पोलिसांना दिले आहेत. अधिक वाहतुकीची स्थळ निश्चिती करून वाहतुकीचे नियमन केले जाईल, असे ही पाटील यांनी सांगितले. राज्यात सर्वदूर वाहतकिीची समस्या सारखीच असून गृहविभागाचा मंत्री म्हणून ही समस्या सोडविण्यासाठी दीर्घकालीन योजनांचे नियोजन सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, उपायुक्त नितीन पवार हे उपस्थित होते.

ट्रान्सपोर्ट नगर शहराबाहेर
नागपुरीगेटच्या हद्दीत असणाऱ्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये बेफाम ट्रक वाहतूक होत असल्याचे बैठकीदरम्यान कळ्यानंतर अकोल्याप्रमाणे अमरावतीचे ट्रान्सपोर्ट नगर शहराबाहेर हलविणे शक्य आहे का? या शक्यतेवर यंत्रणेशी मंथन करुन योग्य निर्णय घेणार असल्याचे पाटील म्हणाले.

पत्रपरिषदेदरम्यान गुडेवारांशी चर्चा
पत्रकार परिषद सुरु असताना वाहतुकीसंदर्भात पाटील यांनी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार भ्रमणध्वनीवरुन यांच्याशी चर्चा केली. राजापेठ बसस्थानक, ट्रान्सपोर्ट नगर, सुरक्षित वाहतूक आणि महापालिकेच्या जबाबदारीबाबत पाटील यांनी गुडेवारांना निर्देश दिले.
‘सोशल रिस्पान्सबिलीटी’ महत्त्वाची
वाहतूक नियमासाठी आणि अपघातमुक्त शहरासाठी ‘सोशल रिस्पान्सबिलिटी महत्त्वाची असल्याचे पाटील म्हणाले.

Web Title: 'Cobbling' to break the vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.