मेळघाटात घरोघरी सर्दी-खोकला-तापाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:59+5:302021-04-14T04:11:59+5:30
धारणी तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. लसीकरण युद्धस्तरावर सुरू होते. परंतु, लसींचा साठा संपल्यामुळे गुरुवारपर्यंत लसीकरण सुरू ...
धारणी तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. लसीकरण युद्धस्तरावर सुरू होते. परंतु, लसींचा साठा संपल्यामुळे गुरुवारपर्यंत लसीकरण सुरू होण्यासाठी वाट पाहावी लागेल, अशी परिस्थिती आहे. लस घेतलेले लोक मृत्युमुखी पडत असल्याचा गैरसमज आदिवासींमध्ये पसरली आहे. त्यातच व्हाॅट्सॲपच्या माध्यमातूनसुद्धा लस सुरक्षित नसल्याचे अनेक पोस्ट फिरत असल्याने आधीच अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडलेल्या धारणीसारख्या आदिवासी भागात लसीकरणाबद्दल संभ्रम आहे.
धारणी तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत पवार हे स्वतः आठवडाभरापासून कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी एप्रिल महिना अत्यंत धोकादायक असून, नागरिकांनी सतर्कता बाळगावी, अशी सूचना केली आहे. होम क्वारंटाईन असल्यास घरीच राहणे आणि इतरांनी तोंडाला मास्क लावूनच सार्वजनिक जागेवर सामाजिक अंतर ठेवण्याचे भान राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.