थंडी पोषक, ढगाळ वातावरण घातक

By admin | Published: January 18, 2017 12:03 AM2017-01-18T00:03:17+5:302017-01-18T00:03:17+5:30

मागील दोन आठवड्यापासून थंडीची लाट गहू व हरभऱ्यासाठी पोषक असताना अचानक वातावरणात बदल झाला.

Cold nutrition, cloudy environment fatal | थंडी पोषक, ढगाळ वातावरण घातक

थंडी पोषक, ढगाळ वातावरण घातक

Next

रबी हंगाम : हरभरा, फळपिकांवर किडींची शक्यता
अमरावती : मागील दोन आठवड्यापासून थंडीची लाट गहू व हरभऱ्यासाठी पोषक असताना अचानक वातावरणात बदल झाला. तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे हरभऱ्यासह फळपिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. वेळीच व्यवस्थापन न केल्यास पिकांच्या सरासरी उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो.
यंदाच्या रबी हंगामात एक लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. जिल्ह्याच्या सरासरी एक लाख ४४ हजार ९०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत पेरणीची ही टक्केवारी ११२ टक्के आहे. यंदा जिल्ह्यात हरभऱ्यासाठी ९३ हजार सरासरी क्षेत्र असताना एक लाख १२ हजार ८०० हेक्टर पेरणी झाली. पेरणीची ही टक्केवारी १२१ टक्के आहे. तसेच गव्हासाठी ४६ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना ४७ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही टक्केवारी १०३ टक्के आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जमिनीत, शेतात मोठ्या प्रमाणात असलेली आर्द्रता, विहिरींच्या जलपातळीत झालेली वाढ, धरणात पाण्याचा मुबलक

कांदापिकावर अनिष्ट परिणाम
अमरावती : साठा असल्याने रबीला सिंचनासाठी उपलब्ध होणारे पाणी व खरिपामधील सोयाबीन, मूग व उडदाचे रिक्त झालेले क्षेत्र आदी घटकांचा परिणाम होऊन यंदा रबीची विक्रमी क्षेत्रवाढ झाली. मागील महिनाभऱ्यापासून पडलेली थंडी व उबदार वातावरण गहू व हरभरा पिकास पोषक होते. परंतु वातावरणात अचानक बदल झाल्याने तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे यामुळे हरभऱ्यावर घाटेअळी व फळपिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदापिकावर देखील वातावरणाचा अनिष्ट परिणाम होणार आहे. त्यामुळे वेळीच व्यवस्थापन केल्यास सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)असे करा व्यवस्थापन
किडीचा प्रादुर्भाव असेल तर प्रथम पिकाचे निरीक्षण करावे. ४० ते ५० टक्के पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर पहिली फवारणी निंबोळी अर्क पाच टक्के किंवा घाटे अळीचा विषाणू एचएनपीव्ही हेक्टरी ५०० एलई अधिक ५० ग्रॅम राणीपाल याप्रमाणे करावी. यामुळे घाटेअळीचे नियंत्रण होऊन नैसर्गिक मित्र असलेल्या किटकांना अपाय होत नाही. त्यांचेद्वारेही घाटेअळीचे नियंत्रण होण्यास मदत होते. दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी. यासाठी निंबोळी अर्क पाच टक्के किंवा एचएएनपीव्ही ५०० एलई यामध्ये क्लिनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली., मिश्र किटकनाशक ट्रायझेफॉस ३५ टक्के अधिक डेज्टामेथ्रीन एक टक्का २५ मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची अर्धी मात्रा मिसळल्यास फायदा होतो, असे कृषी विभागाने सांगितले.

या आठवड्यात ढगाळ वातावरण असल्याने हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन अनुदानावर किटकनाशके उपलब्ध करावीत.
- प्रवीण भोजने,
शेतकरी, शेंदूरजनाघाट

ढगाळ वातावरणासोबत दाट धुके किंवा पाऊस असता तर किडींचा अधिक प्रादुर्भाव होतोे. मात्र सध्या अशी स्थिती नाही. थोड्या फार प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
- दत्तात्रय मुडे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Cold nutrition, cloudy environment fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.