ओला-सुका कचऱ्याची विल्हेवाट एकत्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:58 PM2018-11-05T22:58:17+5:302018-11-05T22:58:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा, अशी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करणाऱ्या महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला ...

Collect waste-dry garbage collection | ओला-सुका कचऱ्याची विल्हेवाट एकत्रच

ओला-सुका कचऱ्याची विल्हेवाट एकत्रच

Next
ठळक मुद्देमहापालिकेचा भोंगळ कारभार : नागरिक सुधारले, प्रशासन झोपेतच

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा, अशी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करणाऱ्या महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान...’ असा महापालिकेचा कारभार सद्यस्थितीत शहरात सुरू आहे. नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकतात. मात्र, महापालिकेची वाहने पुन्हा दोन्ही कचरा एकत्रित घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. स्वच्छतेवर विशेष भर देण्यासाठी देशभरात जनजागृती केली जात आहे. इंटरनेवर अ‍ॅप तयार करून अस्वच्छतेच्या तक्रारीची सोय केली. स्वच्छतेविषयी शासन गांभीर्याने विचार करीत असतानाही ही महापालिका मात्र दुर्लक्ष करीत आहे. शहरात रोगराईचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शहरात डेंग्यूने उच्छाद याशिवाय डासांच्या प्रकोपाने अमरावतीकरांची झोप उडाली आहे. जिकडे-तिकडे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. इतके मोठे संकट अमरावतीकरांसमोर असताना महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. शहराच्या स्वच्छतेचे कामकाज पाहणाºया महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक प्रभाग व वॉर्डात स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. कचरा गोळा करण्यासाठी घंटीकटला भिरभिरत आहेत. ध्वनिक्षेपकाद्वारे सुका व ओला कचरा वेगवेगळा गोळा करण्याचे नागरिकांना सांगण्यात येते. त्या अनुषंगाने नागरिक वेगळेवेगळ्या खोक्यात कचरा टाकतात. मात्र, महापालिकेच्या घंटीकटल्यात सुका व ओला कचरा वेगळे ठेवण्याची सोयच नसल्याने तो एकत्रच वाहून नेला जातो. परिणामी नागरिकांचे परिश्रम व शासनाची जनजागृती व्यर्थ ठरत संताप शहरात उफाळून आला आहे.
सातुर्णा, नवाथेनगरात हाच प्रकार
सातुर्णा स्थित प्रसादनगर, मेहेरबाबा कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनीत घंटीकटल्याद्वारे कचरा गोळा केला जातो. मात्र, ओला व सुका कचरा एकत्रित घंटीकटल्यात टाकला जात आहे. याशिवाय नवाथेनगरात घंटीकटला नियमित येतच नाही. येथेसुद्धा घंटीकटल्यात ओला व सुका कचरा एकत्रितच टाकला जात आहे. कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे.

ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासंबंधी महापालिका घंटीकटल्यातील ध्वनिक्षेपकाद्वारे सांगितले जाते. मात्र, दोन्ही कचरा घंटीकटल्यात एकत्र नेला जातो. महापालिकेने हा काय प्रकार चालविला आहे?
पी.आर.पाटील, नागरिक.

स्वच्छ भारत अभियान राबविणारी महापालिकेचेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. नाल्या तुंबल्या आहेत. खुल्या प्लॉटमध्ये झाडे वाढली आहेत. कचरा उचलताना योग्य पद्धत नाही.
- राजेश जगताप, नागरिक.

Web Title: Collect waste-dry garbage collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.