हॉटेलसमोरील पार्किंगमुळे कलेक्टर कॉलनीवासी आक्रमक

By Admin | Published: February 23, 2016 12:08 AM2016-02-23T00:08:40+5:302016-02-23T00:08:40+5:30

शहरातील प्रख्यात हॉटेलजवळील पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे रविवारी कलेक्टर कॉलनीवासी आक्रमक झाले.

Collector Colonist aggressor for parking in front of hotel | हॉटेलसमोरील पार्किंगमुळे कलेक्टर कॉलनीवासी आक्रमक

हॉटेलसमोरील पार्किंगमुळे कलेक्टर कॉलनीवासी आक्रमक

googlenewsNext

पोलिसांनी बजावली नोटीस : वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी कार जप्त
अमरावती : शहरातील प्रख्यात हॉटेलजवळील पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे रविवारी कलेक्टर कॉलनीवासी आक्रमक झाले. रात्री शेकडो वाहने रस्त्यावर उभी असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. शहर कोतवाली पोलिसांनी कलेक्टर कॉलनीमार्गावर उभी असलेली कार जप्त केली असून हॉटेल संचालकाला नोटीस बजावली आहे.
कॅम्प रोड स्थित या हॉटेलमध्ये रविवारी रात्री लग्न समारंभाचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांनी हॉटेलसमोरील पार्कीगमध्ये वाहने उभी केली होती. तसेच अपुऱ्या पार्कींग व्यवस्थेमुळे अधिकाअधिक वाहने कलेक्टर कॉलनी मार्गावर उभी होती. रस्त्यावरच वाहने उभी असल्यामुळे कलेक्टर कॉलनीतील रहिवाशांना घरी जाण्यासाठी मार्गाच उरला नव्हता. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे शेकडो रहिवाशांमध्ये रोष उफाळून आला. याबाबत काही रहिवाश्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवर माहिती दिली. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहर कोतवाली ठाणेदार आर.के.शर्मा हॉटेलसमोर पोहोचले. त्यांनी पार्कींगमधील वाहनांची कोंडी सोडविण्याचे प्रयत्न केले. मात्र, लग्नसमारंभात मग्न असलेले वाहनधारक बाहेर आलेच नाही. याबाबत रहिवाशांनी रोष व्यक्त केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक वाहनांची तोडफोड करण्याच्या बेतात असताना पोलिसांनी हॉटेल संचालकासोबत चर्चा केली. मात्र, ही समस्या नेहमीचीच असल्यामुळे कलेक्टर कॉलनीवासी रोष व्यक्त केला.

लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात आलेल्या नागरिकांनी वाहने कलेक्टर कॉलनी मार्गावर लावले होते. स्थानिक रहिशावाशांना त्यांची वाहने नेता येत नव्हती. यासंदर्भात हॉटेल संचालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच एक कार सुध्दा जप्त करण्यात आली.
- आर.के.शर्मा,
पोलीस निरीक्षक,

Web Title: Collector Colonist aggressor for parking in front of hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.