जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी केली लसीकरण केंद्रांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:24+5:302021-05-14T04:13:24+5:30
अमरावती : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी जिल्हा रुग्णालयाचे नर्सिंग स्कूल व महापालिकेचा आयसोलेशन दवाखाना ...
अमरावती : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी जिल्हा रुग्णालयाचे नर्सिंग स्कूल व महापालिकेचा आयसोलेशन दवाखाना येथील लसीकरण केंद्राला गुरुवारी भेट दिली. केंद्रावर त्रिसूत्रीच्या पालनासह गर्दी टाळण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले. लसीकरणास सुरूवात झाल्यानंतर लगेच ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड व्यक्तींना लस दिली जात आहे. याचे महत्व लक्षात घेऊन मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सतत हात धुणे ही कोरोना प्रतिबंधाची त्रिसूत्री करण्याची गरज असल्याचे सांगितले.
शहरी आरोग्य केंद्राची पाहणी करून तेथे येणाऱ्या नागरिकांची माहिती जाणून घेतली. कोरोना चाचणी कक्षालाही भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला व कर्मचाऱ्यांना स्वत:ची सुरक्षितता पाळण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
बॉक्स
महापालिका आयुक्तांचा नागरिकांशी संवाद
मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर, चाचणी व लसीकरण ही पंचसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आयुक्त प्रशांत रोडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना केले. अमरावती शहरात लसीकरण केंद्र तयार करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा. कर्मचाऱ्यांना स्वत: दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.