जिल्हाधिकारी पोहोचले अचलपूर उपविभागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:07 AM2021-05-03T04:07:53+5:302021-05-03T04:07:53+5:30
फोटो पी ०२ नवाल चांदूरबाजार, अचलपूर : कंटेन्मेंट झोनबाबत शासनाने दिलेल्या सूचनांनुसार काटेकोरपणे नियम पाळण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ...
फोटो पी ०२ नवाल
चांदूरबाजार, अचलपूर : कंटेन्मेंट झोनबाबत शासनाने दिलेल्या सूचनांनुसार काटेकोरपणे नियम पाळण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल अचलपूर येथे दिले.
ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवाल यांनी शुक्रवारी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यांना भेटी देऊन रुग्णालयांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, नपा अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागात कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आवश्यक तिथे तपासणी व वेळेत उपचाराला गती द्यावी. ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी. याबाबत आवश्यक ती सामग्री मिळवून देण्यात येईल. गृहविलगिकरणाचे नियम रुग्णांनी काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी संपर्क, देखरेख, समन्वय नियमित ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
अचलपूर व चांदूर बाजार शहरातील स्थितीचा आढावाही त्यांनी घेतला व तेथील रुग्णालयानाही भेट दिली. यावेळी त्यांनी काही नागरिकांशी संवाद साधून व्यवस्थेबाबत विचारपूस केली. सावळी दातुरा येथील लसीकरण केंद्राला त्यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.