सुकळी कचरा डेपोची कलेक्टरकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:46 AM2019-09-03T00:46:34+5:302019-09-03T00:47:04+5:30

सुकळी कचरा डेपोत घनकचºयाचे उल्लंघन होत असल्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी बजावलेल्या नोटीसनंतर रविवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुकळी कचरा डेपो व लालखडी येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. यावर स्पष्ट मत हरित लवादाला एक महिन्याच्या आत द्यावे लागणार आहे.

Collector's Collection of Dry Waste Depot | सुकळी कचरा डेपोची कलेक्टरकडून पाहणी

सुकळी कचरा डेपोची कलेक्टरकडून पाहणी

googlenewsNext
ठळक मुद्देघनकचऱ्याचे उल्लंघन : राष्ट्रीय हरित लवादाला देणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सुकळी कचरा डेपोत घनकचºयाचे उल्लंघन होत असल्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी बजावलेल्या नोटीसनंतर रविवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुकळी कचरा डेपो व लालखडी येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. यावर स्पष्ट मत हरित लवादाला एक महिन्याच्या आत द्यावे लागणार आहे.
महापालिका आयुक्त संजय निपाणे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय व्यवस्थापक संजय पाटील त्यांच्या सोबत होते. सुकळी कचरा डेपोत घनकचरा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) व महापालिकेचे आयुक्त यांना गुरुवारी नोटीस बजावली, तसेच जिल्हाधिकारी व एमपीसीबीने संयुक्त पाहणी करून महिनाभरात अहवाल मागितला आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश अनासने यांनी ७ ऑगस्टला राष्ट्रीय हरित लवादाकडे याप्रकरणी याचिका दाखल केली. हरित लवादाने जारी केलेल्या नोटीसीत सुकळी कचरा डेपोत घनकचरा नियमांचे उल्लंघन केल्याचा उल्लेख आहे. याशिवाय कचºयाचे वर्गीकरण, कचºयाची गळती, घातक घनकचरा व याचे मानवी जीवनावर होणाºया अनिष्ठ परिणामांचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी १५ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. यावेळी या तीनही प्रतिवादींना हरित लवादाने उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना प्रक्रियेची
माहिती आयुक्तांद्वारा
जिल्हाधिकारी, ‘एमपीसीबी’चे विभागीय व्यवस्थापक यांच्या संयुक्त दौºयात सुकळी स्थित घनकचरा प्रकल्पाची वस्तुस्थितीची माहिती महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी दिली. याशिवाय प्रस्तावित घनकचरा प्रक्रियेची माहिती यावेळी देण्यात आली. सुकळी बायोमायनिंग प्रकल्पाची निनिदा प्रक्रिया झालेली आहे. लवकरच या ठिकाणी काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘एमपीसीबी’चे दुर्लक्ष, कारवाई केव्हा?
सुकळी येथील कचरा डेपोमध्ये सातत्याने होत असलेले प्रदूषण, घनकचºयाचे उल्लंघन, तेथे लागलेल्या आगीमुळे मानवी जीवनावर होत असलेले अनिष्ठ परिणाम, या ठिकाणी उघड्यावर टाकली गेलेली मृत जनावरे, प्रतिबंधित गुटख्याची याच ठिकाणी लावण्यात येत असलेली विल्हेवाट अशा अनेक प्रकरणांत पर्यावरणप्रेमींकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सातत्याने तक्रारी करण्यात आल्यात. यावर नोटीस बजावण्याव्यतिरिक्त कुठलीही कारवाई, या अधिकाºयांनी केलेली नाही. त्यामुळेच हा प्रकार वाढीस लागला आहे. यात एमपीसीबीलादेखील दोषी मानून त्यांच्यावर कारवाईची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

Web Title: Collector's Collection of Dry Waste Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.