महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:31+5:302021-07-19T04:10:31+5:30

अमरावती : केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने यंदा महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहे. ...

College first year admission will be completed by September 30 | महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत होणार पूर्ण

महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत होणार पूर्ण

Next

अमरावती : केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने यंदा महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहे. ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षांचा पर्याय ठेवण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

कोरोना नियमावली पुढे देखील सुरू राहील, असे संकेत यूजसीने दिले आहे. परिस्थितीनुसार महाविद्यालयीन परीक्षा अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या घेण्यात येतील. शाखानिहाय परीक्षा घेताना सत्र २, सत्र ४ हे अंतर्गत गुण ५० आणि सहाव्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बारावीचा निकाल जाहीर होताच महाविद्यालीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठांना कार्यवाही करावी लागेल. साधारणत: १ ऑक्टोबरपासून प्रथम वर्षाचे शैक्षणिक सत्र आरंभण्याची तयारी महाविद्यालयांना करावी लागणार आहे. यूजीसीच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी विद्यापीठांनी तयारी चालविली आहे.

---------------------

कोट

युजीसीचे पत्र नव्या शैक्षणिक सत्राबाबत गाईडलाईन मिळाल्या आहेत. परीक्षा, निकाल, प्रवेशाबाबतच्या सूचनांचे पालन करण्यात येतील. महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ. अमरावती विद्यापीठ.

Web Title: College first year admission will be completed by September 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.