महाविद्यालयात होणार बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या सम सत्राच्या परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:10+5:302021-03-31T04:14:10+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये हिवाळी २०२० बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या सम सत्राच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये हिवाळी २०२० बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या सम सत्राच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाविद्यालयांनाच प्रश्नपत्रिका तयार करायच्या असून, प्रचलित पद्धतीने विद्यापीठात गुण पाठवावे लागणार आहे.
सम सत्राच्या परीक्षांमध्ये एकूण ४० प्रश्न विद्यार्थ्यांना विचारावे लागणार आहे. पेपर सेट महाविद्यालयांना तयार करावे लागतील. ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने बॅकलॉग विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. महाविद्यालयाने कोणत्या प्रकारची प्रश्नपत्रिका काढली, त्याची प्रत विद्यापीठाला पाठवावी लागेल, अन्यथा त्या महाविद्यालयांचे निकाल जाहीर होणार नाही, अशी अट लादण्यात आली आहे. बॅकलॉग परीक्षांमध्ये एकंदरीत १५ हजार विद्यार्थी असून, पाचही जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा महाविद्यालयांत होत आहे. अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सम सत्र (दुसरे व अंतिम सत्र वगळून) ६ ते १० एप्रिल या दरम्यान होतील. अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमांचे सम सत्र (अंतिम वर्ष/ अंतिम सत्र वगळून) प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २० एप्रिल या दरम्यान, तर ७ ते १२ एप्रिल या दरम्यान लेखी परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
--------------
कोट
हिवाळी २०२० बॅकलॉग परीक्षांचे नियोजन महाविद्यालय स्तरावर होणार आहे. परीक्षा आटोपल्यानंतर प्रचलित पद्धतीने गुण पाठवायचे आहेत. विद्यार्थ्यांचे निकाल परीक्षानिहाय, सत्रनिहाय पाठविणे बंधनकारक आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.