कलर्स प्रस्तुत महाकालीचे महामंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:09 AM2017-07-18T00:09:29+5:302017-07-18T00:09:29+5:30
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते- शक्तीची देवता, भक्तीची प्रेरणा- आई जगदंबा असो की माँ महाकाली असो ....
२० जुलै रोजी ‘अंत ही आरंभ है’
लोकमतच्या वाचकांसाठी स्पर्धा : एकल व समूह नृत्य स्पर्धेत ‘दाखवा आपले कौशल्य’ विजेत्यांना आकर्षक पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते- शक्तीची देवता, भक्तीची प्रेरणा- आई जगदंबा असो की माँ महाकाली असो तिच्या विविध रूपातून तिच्या अलौकिक शक्तीचे दर्शन भक्तांना घडत असते. मग हा भक्त आपल्या भक्तीद्वारे तिला प्रसन्न करीत असतो. मग ती पूजा, अर्चना, आरती असो की नृत्य, भजन, गोंधळ असो. म्हणूनच कलेची उपासना ज्या देवीला आवडते तिच्या स्वरूपात आपल्या भक्तांसाठी महाकालीचे मंच म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्याच्या स्वरूपात देवीच्या आराधनेतून सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम आध्यात्मीक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम ठरणार आहे; हे निश्चित. २० जुलै रोजी स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे हा कार्यक्रम ३ वा आयोजित केला आहे. यात एकलनृत्य व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धा सर्व लोकमत वाचकांसाठी खुली असून 10 वर्षाच्या वर कुणीही स्त्री किंवा पुरुष यात सहभागी होऊ शकतात. नृत्य ज्या गीतावर आधारित आहे त्याचा कालावधी ५ मिनिट असून त्यात सामाजिक संदेश असणे आवश्यक आहे. ज्यात हुंडाबळी, बेटी बचाओ, महिला सशक्तीकरण, स्त्री अत्याचार इ. समावेश असावा. प्राथमिक फेरी दि. १९ जुलै रोजी लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकूल, मोर्शी रोड, अमरावती येथे ३ वाजता घेण्यात येणार आहे.
महाकालीचे महामंच याद्वारे कलाकारांना घडविणार आहे. असे म्हणतात शिव हा शक्तीशिवाय शव आहे. शक्तीची देवता महाकाली शिवाय शिव अपूर्ण आहे. आपल्या अक्राळ-विक्राळ शक्तीने महाकाली ओळखल्या जातात. पण संहारक म्हणून महाकाली पुज्य आहे. अशा या महाकालीचे दर्शन तिची महिमा सांगणारी कलर्सची येणारी मालिका म्हणजे महाकाली, अंत ही आरंभ है. ही मालिका २२ जुलै रोजी प्रसारित होणार असून प्रत्येक शनिवार व रविवारी संध्या. ७ वा. कलर्स चॅनलवर बघायला विसरू नका. या मालिकेद्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्न कलर्स चॅनलद्वारे देण्यात आले आहे. स्त्री ही वात्सल्यमूर्ती आहे पण प्रसंगी ती महाकालीचे रूप धारण करून दुष्टांचा संहार करते. नाजूक कोमल हृदयाची स्वामिनी रणचंडिका होऊन संहारक बनते तेव्हा तिच्यातील शक्तीचा बोध घेणे हा मालिकेचा उद्देश आहे आणि म्हणूनच अशा नृत्य स्पर्धेतून हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्व वाचक वर्ग कार्यक्रम बघण्याकरिता सादर आमंत्रित आहे. स्पर्धा देखील नि:शुल्क असून स्पर्धेची नोंदणी कार्यालयात येऊन करावी लागेल. अधिक माहितीसाठी संपर्क- 9850304087, 9922427794 यावर संपर्क साधावा.