पक्षात परत या! आप्तांच्या माध्यमातून आमदारांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 05:00 AM2022-06-24T05:00:00+5:302022-06-24T05:00:26+5:30

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ‘शिवसेना की शिंदेसेना?’ असे चित्र उभे झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईच्या शिवसेना भवनातून जिल्ह्यातील लोकभावना जाणून घेण्यात आल्या. ज्या जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार आहेत, अशा जिल्ह्यांतील सेना पदाधिकाऱ्यांद्वारे आमदारांचे नातेवाईक, आप्तांच्या संपर्कातून शिवसेनेत परत या, अशी विनंती करण्यात येत आहे. जिल्ह्यात सेनेचा एकही आमदार नाही.

Come back to the party! Appeal to MLAs through Aptas | पक्षात परत या! आप्तांच्या माध्यमातून आमदारांना आवाहन

पक्षात परत या! आप्तांच्या माध्यमातून आमदारांना आवाहन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सत्तासंघर्षाचा नवा राजकीय डाव उभा ठाकला आहे. एकनाथ शिंदे यांच्या कंपूत सेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेेनेची ‘ग्राऊंड लेव्हल’ पकड मजबूत राहावी व या घटनेच्या अनुषंगाने शिवसैनिकांच्या व्यथा, वेदना  जाणून घ्याव्यात, यासाठी सेना भवनातून आढावा बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे. 
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ‘शिवसेना की शिंदेसेना?’ असे चित्र उभे झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईच्या शिवसेना भवनातून जिल्ह्यातील लोकभावना जाणून घेण्यात आल्या. ज्या जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार आहेत, अशा जिल्ह्यांतील सेना पदाधिकाऱ्यांद्वारे आमदारांचे नातेवाईक, आप्तांच्या संपर्कातून शिवसेनेत परत या, अशी विनंती करण्यात येत आहे. जिल्ह्यात सेनेचा एकही आमदार नाही. तथापि,  वरिष्ठांकडून शिवसैनिकांसह जिल्ह्यातील लोकभावना जाणून घेतल्याची माहिती आहे. 
अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे येथे फारशी राजकीय घडामोडीची शक्यता नाही, असे स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कोणत्याही आमदारांशी संपर्क साधण्याबाबत सेनाभवनातून निरोप नाही. मात्र, जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
- सुनील खराटे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. सेना भवनातून तशी कोणतीही विचारणा नाही. मात्र, जिल्ह्यात सतर्क राहण्याचे कळविले आहे.
- पराग गुडधे, महानगर प्रमुख, शिवसेना

पदाधिकाऱ्यांना गृह जिल्ह्यात थांबण्याचे आदेश आहेत. कोणत्याही आमदारांना संपर्क अथवा मोबाईलने संवाद साधण्याचे कळविले नाही.
- राजेश वानखडे, 
जिल्हाप्रमुख, शिवसेना

 

Web Title: Come back to the party! Appeal to MLAs through Aptas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.