स्वच्छता कंत्राटदारांच्या ‘मोनोपली’ला आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:28 PM2018-05-11T22:28:47+5:302018-05-11T22:28:47+5:30

महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी स्वच्छता कंत्राटदारांच्या एकाधिकारशाहीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील दोन दिवसांत पाच कंत्राटदारांना अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात आला .

Come clean to cleaner contractors' monopoly | स्वच्छता कंत्राटदारांच्या ‘मोनोपली’ला आळा

स्वच्छता कंत्राटदारांच्या ‘मोनोपली’ला आळा

Next
ठळक मुद्देअडीच लाखांचा दंड : आयुक्तांची ‘स्पॉट व्हिजिट’

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी स्वच्छता कंत्राटदारांच्या एकाधिकारशाहीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील दोन दिवसांत पाच कंत्राटदारांना अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात आला .
गतवर्षी एकल कंत्राटाचे वारे वाहू लागल्यानंतर स्वच्छता कंत्राटदारांच्या मनमानीत वाढ झाली. आम्ही मुदतवाढीवर काम करीत आहोत. करारनामा तर केव्हाच संपुष्टात आला आहे. वाढीव मोबदला देत असाल, तरच काम करू, अशी विविध क्लृप्त्या लढवून मागील वर्षभरात स्वच्छतेचा बोजवारा उडविला जात आहे. स्वास्थ्य निरीक्षक व बीट प्यूनवर कंत्राटदारांच्या कामगारांची दैनंदिन हजेरी तपासून देयके प्रस्तावित करणे अभिप्रेत असताना, प्रत्यक्ष काम करणाऱ्या या यंत्रणेत भ्रष्टाचार शिरल्याने स्वच्छता कागदावर होऊ लागली. मात्र स्वास्थ्य निरिक्षक व ज्येष्ठ स्वास्थ्य निरिक्षकांकडून वरिष्ठांना ‘आॅलवेल’चा अभिप्राय येत असल्याने कंत्राटदारांचे फावले. आम्ही महापालिकेवर उपकार करित आहोत, या अविर्भावातून काही स्वच्छता कंत्राटदार काम करित असल्याने व दंड केल्यास काम सोडण्याची भाषा करीत असल्याने प्रशासनाचा नाई$$$$$लाज झाला. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त हेमंत पवार यांनी गुरुवारी फ्रेजरपुऱ्यातील नाल्यांची पाहणी केली. दैनंदिन स्वच्छतेत येणाऱ्या छोट्या नाल्यांची दुरवस्था त्यांनी अनुभवली व के.के. कंस्ट्रक्शन स्वच्छता कंत्राटदाराला ५० हजाराचा दंड ठोठावला. शुक्रवारी आयुक्तांनी उपायुक्त नरेंद्र वानखडे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यासह साईनगर व बडनेऱ्यातील स्वच्छतेविषयक पाहणी केली. दुपारी त्यांनी अंबा नाल्याची पाहणी केली.
चार कंत्राटदारांना दोन लाखांचा दंड
अंबापेठमधील जानकी स्वयंरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्था व क्षितिज बेरोजगार, प्रभाग क्रमांक २१ जुनी वस्तीमधील बहिरमबाबा नागरी सेवा संस्था व प्रभाग क्रमांक २२ मधील सायमा सुशिक्षित बेरोजगार संस्था या चार स्वच्छता कंत्राटदारांना शुक्रवारी प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला. स्वास्थ्य निरिक्षक ए.ए. शेख व जयकुमार उसरे यांची एक महिन्याची वेतन कपात करण्यात आली. आयुक्तांसह उपायुक्त व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आकस्मिक पाहणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Come clean to cleaner contractors' monopoly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.