‘चला बोलूया...नैराश्य टाळूया..’

By admin | Published: April 7, 2017 12:17 AM2017-04-07T00:17:33+5:302017-04-07T00:17:33+5:30

आज ७ एप्रिल रोजी आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करीत आहोेत. बदलत्या काळानुरूप आरोग्याच्या बदलत्या संकल्पनांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.

'Come on, let's face ... depression ..' | ‘चला बोलूया...नैराश्य टाळूया..’

‘चला बोलूया...नैराश्य टाळूया..’

Next

उपचार शक्य : वेगवान जीवनशैलीमुळे वाढताहेत मनोविकार
वैभव बाबरेकर  अमरावती
आज ७ एप्रिल रोजी आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करीत आहोेत. बदलत्या काळानुरूप आरोग्याच्या बदलत्या संकल्पनांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. याअनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने यंदा ‘चला बोलूया..नैराश्य टाळूया’ हे घोषवाक्य घेतले असून त्याअनुषंगाने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.
तल्लख मेंदुच्या बळावर जगताना मानवाने अनेक नवे सुखकारक बदल घडवून आणलेत. बुद्धीच्या बळावर विज्ञानाला गुलाम बनवून एका नवीन समाजव्यवस्थेचा जन्म झाला. त्यामुळे मानवाची झपाट्याने प्रगती झाली. या नव्या समाजव्यवस्थेत अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोेबर आणखीही बरेच काही मानवाला मिळाले. पण, मोबदल्यात शरीराचे आरोग्य आणि मनाचे समाधान मात्र हिरावून घेतले. म्हणूनच िप्रत्येकाला आज कुठे ना कुठे्, कधी ना कधी नैराश्याचा सामना करावा लागतो. आयुष्यातील इतर सकारात्मक गोष्टी विसरून फक्त नकारात्मक परिस्थितीला उराशी कवटाळून ठेवणे म्हणजे नैराश्य. मर्यादेपलिकडे दु:खाला ताणून धरणे म्हणजे नैराश्य. त्यामुळेच निराशा हे आजारी मनाचे प्राथमिक लक्षण असते. स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत ‘नैराश्य आजारा’वर विशेष मोहीम राबविणार असून जिल्हा शल्य चिकित्सक अरूण, मानसोपचार तज्ज्ञ अमोल गुल्हाने, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता दीपक ठाकरे हे विशेष मोहीम राबवित आहेत.

नैराश्याची प्रमुख दोन लक्षणे
सतत उदास वाटणे, कोणत्याही कामात मन न लागणे, ही नैराश्य या आजाराची दोन प्रमुख लक्षणे आहेत. सोबतच झोप न लागणे, एकाग्रता, आत्मविश्वास कमी होणे, अस्वस्थता, आत्महत्येचे विचार मनात सातत्याने घोळणे, ही लक्षणे देखील आढळून येतात. जेव्हा-जेव्हा व्यक्ती मनोविकृतीने पछाडते तेव्हा एक गोष्ट निश्चित दिसून येते ती म्हणजे रूग्णाचे व कुटुंबियांचे किंवा त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांचे बिघडलेले संबंध पूर्ववत चांगले होत नाहीत तोवर ही स्थिती अशीच राहते. यासाठी रूग्णाला औषधोपचारासोबतच समुपदेशन व कुटुंबियांना रूग्णांच्या पुनर्वसनाबाबत माहिती देणे गरजेचे असेत.

Web Title: 'Come on, let's face ... depression ..'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.