दिलासा, संक्रमणमुक्त उच्चांकी ९८ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:24+5:302021-07-07T04:14:24+5:30
अमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने घट झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९४,२६२ नागरिक संक्रमणमुक्त झाले आहेत. ही ...
अमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने घट झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९४,२६२ नागरिक संक्रमणमुक्त झाले आहेत. ही टक्केवारी उच्चांकी ९८ टक्के असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. दरम्यान, आठ हजारांवर ॲक्टिव्ह रुग्णांचा उच्चांकी झाल्याने संक्रमणमुक्त नागरिकांचा टक्का घसरला होता. मात्र, या लाटेला ओहोटी लागताच पुन्हा संक्रमणमुक्त नागरिकांचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६,१७६ नागरिक संक्रमित झाल्याची नोंद आहे.
जिल्ह्यात २२ एप्रिल २०२० रोजी पहिल्या संक्रमणमुक्त नागरिकांची नोंद झाली होती. या कालावधीत १५ दिवसांच्या उपचारानंतर रुग्णांची दोन वेळा आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यायची. दोन्ही वेळा अहवाल निगेटिव्ह आल्यासच रुग्णाला सुटी दिली जायची. यानंतरही किमान एक आठवडा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहावे लागत असे. त्यानंतर सुधारित गाईडलाईननुसार दहाव्या दिवशी व आता सहाव्या ते सातव्या दिवशी संक्रमिताला डिस्चार्ज दिला जात आहे. त्यानंतर त्याने किमान १४ दिवशी गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
पाईंटर
असे झाले संक्रमणमुक्त
१ जानेवारी : १९०२१
१ फेब्रुवारी : २१,९७९
१ मार्च : २९,५३१
१ एप्रिल : ४४,९१३
१ मे : ५७,५९६
१ जून : ८६,४५७
१ जुलै : ९४,०८८
बॉक्स
सोमवारी ४७ रुग्णांना डिस्चार्ज
जिल्ह्यात रविवारी संक्रमितांचा मृत्यू निरंक असल्याने दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत मृतांची संख्या १,५५५ झालेली आहे. याशिवाय नव्या ३० पॉझिटिव्हची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९६,१७६ झालेली आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने रविवारी ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध रुग्णालयासह होम आयसोलेशनमध्ये २४५ रुग्ण असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.