दिलासा, मंगळवारी एक टक्के पॉझिटिव्हिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:13+5:302021-06-16T04:16:13+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गात अनपेक्षित घट आली आहे. मंगळवारी ४,२७३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता, एक टक्केच पॉझिटिव्हिटी ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गात अनपेक्षित घट आली आहे. मंगळवारी ४,२७३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता, एक टक्केच पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आली. ही आतापर्यंतचा सर्वांत कमी पॉझिटिव्हिटी ठरली आहे.
मंगळवारी चार संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यास सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची मृत्युसंख्या १,५३० झाली आहे. ४५ नव्या पॉझिटिव्हची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९५ हजार १९५ झाली आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने मंगळवारी ३७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ९२ हजार ३७६ झाली आहे. ही टक्केवारी ९७.०४ आहे.
बॉख्स
२४ तासांतील मृत्यू
उपचारादरम्यान ७५ वर्षीय पुरुष (दहिगाव), ५९ वर्षीय पुरुष (बैलमारखेडा), ५० वर्षीय महिला (अमरावती) व ८९ वर्षीय पुरुष (आनंदनगर, माताखिडकी, अमरावती) या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.