दहावीच्या फेर परीक्षेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:29+5:302021-09-23T04:14:29+5:30
अमरावती : यंदा इयत्ता दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे जाहीर झाला असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसह जुन्या अभ्यासक्रमानुसार अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या ...
अमरावती : यंदा इयत्ता दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे जाहीर झाला असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसह जुन्या अभ्यासक्रमानुसार अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. बुधवारपासून विभागातील ५० केंद्रांवर ऑफलाईन लेखी परीक्षा घेतली जात आहे. यासाठी ५९३ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यात अमरावती जिल्ह्यात १२ परीक्षा केंद्रांवर ११७ विदयार्थी परीक्षा देणार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाव्दारे जाहीर झालेला निकाल ऐतिहासिक ठरला होता. मात्र त्यातही काही विद्यार्थ्याचे मूल्यमापन होऊ न शकल्याने त्यांचे निकाल प्रलंबित आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी संख्या कमी असल्याने ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार जुन्या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले आहेत. ८ आक्टोबरपर्यंत लेखी परीक्षा सुरू राहणार आहे. प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.