दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्जप्रक्रियेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:16 AM2021-08-14T04:16:37+5:302021-08-14T04:16:37+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी ची ...
अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी ची परीक्षा न घेता निकाल लावण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार नुकताच बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विशेष मूल्यांकन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला आहे. परंतु, ज्या विद्यार्थ्याचे या निकालाबाबत काही आक्षेप आहेत किंवा परीक्षा देण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेसाठी नोंदणीसाठी टाईम टेबल जाहीर केला आहे. ११ ऑगस्टपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.
बॉक्स
दोन संधी मिळणार
श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२१ मध्ये श्रेणीसुधार अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना जादाची संधी या परीक्षेद्वारे उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी गतवर्षी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने फक्त अशाच विद्यार्थ्यांना वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तथापि, नव्याने आवेदन भरणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे सन २०२१ चे नियमित विद्यार्थ्यांना सन २०२१ मधील पुरवणी परीक्षा व सन २०२२ मधील मुख्य परीक्षा अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
बॉक्स
यांना देता येणार परीक्षा
दहावी आणि बारावीच्या निकाल विशेष मूल्यांकन पद्धती जाहीर करण्यात आला आहे. मात्र, जे विद्यार्थी या पद्धतीच्या निकालाबाबत संतुष्ट नसतील, अशा विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेनुसार परीक्षा देता येणार आहे. पुनर्परीक्षार्थी आणि खाजगी विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येणार आहे.
बॉक्स
दहावीचा निकाल - ९९.९७ टक्के
दहावीत उत्तीर्ण विद्यार्थी - ३८९६४
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थी - ०८
बॉक्स
बारावी उत्तीर्ण विद्यार्थी - ३३०१०
बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थी - २३६
बारावीचा निकाल - ९९.२९