चांदूर रेल्वे बाजार समितीत सोयाबीन खरेदीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:51+5:302021-09-23T04:14:51+5:30
चांदूर रेल्वे : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारावर २० सप्टेंबरला खासगी व्यापाऱ्यांच्यावतीने सोयाबीन खरेदीचा उपसभापती भानुदास गावंडे यांच्या हस्ते ...
चांदूर रेल्वे : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारावर २० सप्टेंबरला खासगी व्यापाऱ्यांच्यावतीने सोयाबीन खरेदीचा उपसभापती भानुदास गावंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
बाजार समितीचे व्यापारी नितीन गंगन यांनी खुल्या लिलाव पद्धतीमध्ये ६१०० रुपये ही सर्वाधिक बोली लावून सोयाबीन खरेदी केले. शुभारंभाचा मान चांदूर रेल्वे येथील शेतकरी राजेंद्र देशमुख यांना मिळाला. त्यांचा उपसभापती गावंडे, माजी सभापती प्रा. प्रभाकरराव वाघ व उपस्थित संचालकांनी शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. वजन-काट्याचे पूजनही केले. शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, उडीद,
मूग व इतर शेतमालालासुद्धा बाजार समितीच्या आवारावर चांगले भाव मिळत असल्यामुळे आपला शेतमाल विक्रीकरिता बाजार समितीच्या आवारावर आणावा, असे आवाहनदेखील उपसभापतींनी केले.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती प्रदीप वाघ, संचालक अशोक चौधरी, अतुल चांडक, प्रदीप जगताप, रवींद्र देशमुख, प्रवीण घुईखेडकर, रमेश महात्मे, रविकांत देशमुख, वैशाली ठाकरे, हरिभाऊ गवई, राजकुमार जालान, दिलीप मुंदडा, प्रदीप गुजर, शिट्टू ऊर्फ नीलेश सूर्यवंशी व आडते तसेच व्यापारी सुधीर गंगन, नितीन गंगन, सुभाष जालान, सतीश निर्मुंडे, नरेश गावंडे, अनिल गावंडे, राम टावरी, जयराज टावरी, गुणवंत आगाशे, अक्षय पनपालिया, दयाचंद चांडक, सचिन झोपाटे, राजू वऱ्हाडे, विजय सराड, मनोज बगडते, शिवचंद्र वऱ्हाडे तसेच शेतकरी गोपाल नंदरधने, संजय डोंगरे, रीतेश बाबर, मनोहर उपरीकर, उमेश आरेकर, कर्मचारी सचिव चेतन इंगळे, अभिजित देशमुख, किशोर शेळके, जगदीश माहुलकर, गजानराव खडसे, अनंत पोलाड, राजू नागरीकर, प्रफुल ठाकरे
उपस्थित होते.