चांदूर बाजारमध्ये गहू नोंदणीचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:13 AM2021-04-23T04:13:17+5:302021-04-23T04:13:17+5:30

फोटो पी २२ तळवेल तळवेल : चांदूर बाजार तालुक्यात २०२०-२१ या रबी आर्थिक हंगामात एकूण ३,३८०.५० हेक्टर क्षेत्रफळावर ...

Commencement of wheat registration in Chandur Bazaar | चांदूर बाजारमध्ये गहू नोंदणीचा प्रारंभ

चांदूर बाजारमध्ये गहू नोंदणीचा प्रारंभ

Next

फोटो पी २२ तळवेल

तळवेल : चांदूर बाजार तालुक्यात २०२०-२१ या रबी आर्थिक हंगामात एकूण ३,३८०.५० हेक्टर क्षेत्रफळावर यावर्षी गहू पिकाची लागवड करण्यात आली होती. दरवर्षी नाफेडमार्फत योग्य हमीभावात शेतकऱ्यांच्या पिकाची खरेदी केली जाते. यावर्षी नाफेडमार्फत गहू पिकाची खरेदी करण्यासाठी नोंदणीचा प्रारंभ १५ एप्रिलपासून झाल्याची माहिती चांदूर बाजार सहकारी खरेदी विक्रीचे सचिव अशोक सिनकर यांनी दिली.

चांदूर बाजार तालुक्यात गहू पिकाची लागवड सर्वाधिक केली जाते. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पिके उत्कृष्ट असल्याची खुशी सुद्धा जाणवत होती. परंतु काही दिवसांअगोदार अवकाळी पावसाचा आगमन झाल्याने गहू पिकाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी चांदूर बाजार तालुक्यातील गहू पिकाच्या नोंदणीला सुरुवात झाली असून, येत्या ३० एप्रिलपर्यंत नोंदणी चालू राहील तसेच नोंदणी करण्यासाठी गहू पिकाचा पेरा असलेला सातबारा, आधार कार्ड, बँक पासबूक आदी महत्त्वाची कागदपत्रे सोबत जोडणे अनिवार्य आहे.

Web Title: Commencement of wheat registration in Chandur Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.