चेनस्नॅचिंगच्या पार्श्वभुमीवर पोलीस आयुक्त ‘इन ॲक्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:30+5:302021-01-14T04:12:30+5:30

अमरावती : गत काही दिवसांपासून शहरात चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्त आरती सिंह या थेट ...

Commissioner of Police 'in action' against chainsnatching | चेनस्नॅचिंगच्या पार्श्वभुमीवर पोलीस आयुक्त ‘इन ॲक्शन’

चेनस्नॅचिंगच्या पार्श्वभुमीवर पोलीस आयुक्त ‘इन ॲक्शन’

Next

अमरावती : गत काही दिवसांपासून शहरात चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्त आरती सिंह या थेट रस्त्यावर उतरल्या. शहरातील महत्त्वाच्या नाकाबंदी पाॅईंटची तपासणी केली. या दरम्यान संशयित वाहनचालकांची कसून चौकशी करून कागदपत्रांची पाहणी केली.

गुरुवारी असलेल्या मकरसंक्रांती उत्सवानिमित्त हजारो महिला दागदागिने घालून घराबाहेर आप्तमंडळीकडे जाऊन भेटी देतात. या दरम्यान कुठलीही चेनस्नॅचिंग होऊ नये, याकरिता सर्व ठाणेदारांना तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले असून गस्त वाढविण्याचे निर्देशही यावेळी पोलीस आयुक्तांनी दिले. तसेच त्यांनी बुधवारी अचानक नाकाबंदी पाॅईंटला भेटी देऊन कर्तव्यावर हजर अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला. या दरम्यान काही नाकाबंदी पाॅईंटवर गैरहजर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अहवाल पोलीस निरीक्षकांना सादर करण्याचे निर्देशही पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले. तसेच डीसीपी, एसीपी व वरिष्ठ पोेलीस निरीक्षकांनी नाकाबंदी पॉईंटला भेटी देऊन पाहणी करण्याचे त्यांनी आदेशित केले.

Web Title: Commissioner of Police 'in action' against chainsnatching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.