प्राणवायू प्रणाली तपासणीसाठी तज्ज्ञांची समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:13 AM2021-04-28T04:13:45+5:302021-04-28T04:13:45+5:30

अमरावती : जिल्ह्यातील शासकीय, तसेच खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन वायुनलिकांची व प्रणालीची तपासणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. तसा ...

Committee of Experts for Oxygen System Inspection | प्राणवायू प्रणाली तपासणीसाठी तज्ज्ञांची समिती

प्राणवायू प्रणाली तपासणीसाठी तज्ज्ञांची समिती

Next

अमरावती : जिल्ह्यातील शासकीय, तसेच खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन वायुनलिकांची व प्रणालीची तपासणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी निर्गमित केला. या समितीने ३० एप्रिलपूर्वी तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.पी. बोरकर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालकांच्या स्तरावर समिती स्थापित करण्यात आली असून, डॉ. ए.एम. महल्ले हे पथकप्रमुख आहेत. सहायक पथकप्रमुख डॉ. एस.डी. लोंधे, डॉ. राम एम. मेटकर, डॉ. आर.एस. दाळू, डॉ. ए.जी. मतानी, प्रा. आर.एच. सारडा, डॉ. एस.एम. लवंगकर, प्रा. एच.एस. फरकाडे, प्रा. एस.आर. केवते, प्रा. एम.एस. सातपुते, प्रा. एन.डी. सोळंके, प्रा. एम.जे. देशमुख, डॉ. पी.आर. पाचघरे, डॉ. आर.एस. मोहोड, एच.जी. कांबळे आदींचा पथकात समावेश आहे.

बॉक्स

पथकाची कार्ये

जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन वायुनलिकांची व प्रणालीची तपासणी करणे, तपासणीच्या वेळी वायुनलिकेत गळती असल्यास अथवा पुनर्बांधणी आवश्यक असल्यास तसा अहवाल देणे, खासगी रुग्णालयात प्रणालीत बिघाड आढळल्यास तात्काळ सूचना व आवश्यक कार्यवाही करणे अशी समितीची कामे आहेत.

Web Title: Committee of Experts for Oxygen System Inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.