दहिहंडी उत्सवावर ‘समिती’ची नजर

By admin | Published: August 24, 2016 12:06 AM2016-08-24T00:06:52+5:302016-08-24T00:06:52+5:30

आगामी कालावधीत होणाऱ्या दहिहंडी उत्सवावर महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त समितीची नजर राहणार आहे.

The Committee's view on the Dahihandi festival | दहिहंडी उत्सवावर ‘समिती’ची नजर

दहिहंडी उत्सवावर ‘समिती’ची नजर

Next

पोलिसांना मिळाले ध्वनीमापन यंत्र : महापालिकेचा पुढाकार
अमरावती : आगामी कालावधीत होणाऱ्या दहिहंडी उत्सवावर महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त समितीची नजर राहणार आहे.
जनहित याचिका क्र. १७३ च्या अनुषंगाने महापालिकेने झोनस्तरावर ही ध्वनी प्रदूषण नियंत्रण समिती गठित केली आहे. यात संबंधित पोलीस ठाण्याचे ‘इनचार्ज’ आणि महापालिकेच्या त्या-त्या प्रभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दहिहंडी उत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषण व अन्य नियमांचा भंग तर होत नाही ना, या अनुषंगाने या समितीची कार्यकक्षा आहे.
ध्वनीप्रदूषण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने शहर आयुक्तालयाला २० ध्वनी यंत्र पुरविण्यात आले आहेत. गणपती, दुर्गोत्सव, दहिहंडी व अन्य उत्सव, कार्यक्रम, शोभायात्रा अशा अनेक ठिकाणी जेथे ध्वनीचा नियमबाह्य वापर होतो, अशा सर्व ठिकाणी आळा घालण्याकरिता व ध्वनी नियमाचे पालन करण्याकरिता ध्वनी यंत्र देण्यात आले आहे. या दहिहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणासह अन्य कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी ही समिती प्रयत्नशील असते. (प्रतिनिधी)

‘थर’थरारावर निर्बंध
राज्यात साजऱ्या होणाऱ्या दहिहंडीच्या उत्सवात आता १८ वर्षांखालील गोविंदा सहभागी होऊ शकणार नाही. शिवाय दहिहंडीची उंचीही २० फुटांपेक्षा अधिक असणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने बुधवार १७ आॅगस्ट रोजी तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगानेही यंदा महापालिका, पोलीस आणि दहिहंडी उत्सव आयोजकांची जबाबदारी वाढली आहे.

दहिहंडीचे राजकारण !
राज्यातील बहुतांश दहिहंडी उत्सवाचे राजकीय समीकरण बनले आहे. कोट्यवधी रुपयांचे बक्षीस देऊन यात जीवघेणी स्पर्धा शिरली आहे. प्रत्येक १० मागील ८ दहिहंडी उत्सवाचे प्रायोजक, आयोजक हे राजकीय मंडळीच असतात. भररस्त्यावर दहिहंडीला परवानगीच देऊ नये, असे स्पष्ट आदेश असताना ते धुडकावले जातात. राजकीय दबावाखाली परवानगी दिली जाते. अमरावतीसाठी हा प्रकार नवीन नाही

वादावादी अधिक
गतवर्षी जयस्तंभ चौकातील दहिहंडी अर्ध्यावरच बंद पाडण्यात आली. राजकमल चौकातील दहिहंडी उत्सवाला मारहाणीचे गालबोट लागले. काही वर्षांच्या तुलनेत दहिहंडी उत्सवाचे प्रमाणही वाढलेत. जयस्तंभ, राजकमलसह राजापेठ, संत गाडगे बाबानगर, महिलांसाठीच दहिहंडी उत्सव अलीकडे होऊ लागले आहे. या व्यापकतेवर लक्ष ठेवण्यासाठीच या ध्वनीप्रदूषण नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

Web Title: The Committee's view on the Dahihandi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.