सर्वसामान्यांच्या मुलांसाठी सुरू केलेला ज्ञानयज्ञ म्हणजे मुक्तांगण
By admin | Published: August 22, 2015 12:33 AM2015-08-22T00:33:19+5:302015-08-22T00:33:19+5:30
दीप प्रतिष्ठान अमरावती द्वारा आयोजित मुक्तांगण प्राथमिक शाळेच्या प्रांगणात रविवारी वृक्षारोपण करण्यात आले.
अमरावती : दीप प्रतिष्ठान अमरावती द्वारा आयोजित मुक्तांगण प्राथमिक शाळेच्या प्रांगणात रविवारी वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षकांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी सुरु केलेला ज्ञानयज्ञ म्हणजे मुक्तांण शाळा आहे. हा शिक्षणक्षेत्रातील अभिनव प्रयोग असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
सध्या ३७९ विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या मुक्तांगण प्राथमिक शाळेत शिक्षणासोबत सामाजिक भावना रुजविण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरण संवर्धन म्हणून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यक्रारी अधिकारी लांडगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीराम पानझाडे, पंडित पंडागळे, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, ज्ञानेश्वर बोडाखे, गणेश अर्मळ, श्याम मक्रमपूरे, नितीन उंडे, दिवे, प्रकाश कोकाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मोनाली ठाकरे (डुर्गे), सुषमा जवंजाळकर, संगिता देशमुख, रोहिणी बोरेकर, स्मिता वसु, स्नेहल राऊत, पल्लवी जोशी (देशमुख), स्नेहल पकडे, दीपाली किटे, अश्विनी माहोरे, अश्विनी गाडखे, ज्योत्स्ना मेटांगे यांनी परिश्रम घेतले. संचालन प्रिती जवंजाळकर व आभार प्रदर्शन गजानन देशमुख यांनी केले.