दोन आठवड्यांनंतर सार्वत्रिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 10:07 PM2017-08-19T22:07:29+5:302017-08-19T22:07:58+5:30
यंदाच्या हंगामात पेरणीपासून सरासरीच्या तुलनेत ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे. आॅगस्ट महिण्यात तर गेल्या दोन आठवड्यानंतर शुक्रवारी पावसाचे आगमन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या हंगामात पेरणीपासून सरासरीच्या तुलनेत ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे. आॅगस्ट महिण्यात तर गेल्या दोन आठवड्यानंतर शुक्रवारी पावसाचे आगमन झाले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात २२.१ मिमी पाऊस पडल्यानर शेती पिकांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस दोन ते तीन दिवस राहणार असल्याची माहीती हवामान विभागाने दिली. शेतकºयांना मात्र दमदार पावसाची अपेक्षा आहे.
विदर्भ, कोकण व मराठवाडा विभागात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. अरबी समुद्र व महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सध्या चक्राकार वाºयाची स्थिती निर्माण झाली आहे. हा पट्टा अरबी समुद्राकडून महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडे सरकत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान गेल्या २४ तासात जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात २२.१ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ४६.१ मिमी पाऊस वरूड तालुक्यात पडला आहे.यामध्ये अमरावती २४.४, भातकुली १८, नांदगाव १३.५, चांदूर रेल्वे २९.८, धामणगाव २३.४, यिवसा ३१.९, मोर्शी २६.९, अचलपूर १६.७,चांदूर बाजार २६.६,दर्यापूर १३.१, अंजनगाव ९.८,धारणी १६.८ चिखलदरा तालुक्यात १४ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात अद्यापही काही तालुक्यात सरासरीच्या ५० टक्कयाच्या आत पाऊस पडला असल्याने या तालुक्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे.
सरासरीच्या २३३ मिमी पाऊस कमी
एक जून ते १९ आॅगस्ट या कालावधीत ५५७.२ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असतांना पेत्यक्षात ३२४.२ मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस २३३ मिमीने कमी आहे. ही ५८.२ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला ७३८.९ मिमी पाऊस पडला होता. यंदा अंजनगाव सुजीर ३९.९ टक्के, भातकुली ४४, अचलपूर ४५, दर्यापूर ५१ हे तालुक्ये सरासरीत माघारले आहे.