पिकांचा तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:31+5:302021-07-16T04:10:31+5:30
अतिवृष्टीने नुकसान, शिवसेनेची तहसील प्रशासनाकडे मागणी दर्यापूर : तालुक्यात झालेला अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले. अगोदरच ...
अतिवृष्टीने नुकसान, शिवसेनेची तहसील प्रशासनाकडे मागणी
दर्यापूर : तालुक्यात झालेला अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले. अगोदरच कोरोनाकाळात आर्थिक विवंचनेत असलेला शेतकरी डबघाईस आला. त्यानंतर या नैसर्गिक मारामुळे आणखी हवालदिल होऊन जणू शेतकऱ्यावर आभाळ कोसळले आहे. शेतीचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी शिवसेनेने तहसील प्रशासनाकडे केली.
शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल पाटील यांनी तहसीलदार योगेश देशमुख यांना निवेदन दिले. तहसीलदारांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी रवींद्र गणोरकर, गजानन चांदूरकर, योगेश बुंदे, महेंद्र भांडे, विनोद बोरेकर, नीलेश पारडे, विनोद तराळ, राहुल गावंडे, मंगेश भांडे, खंडू पाटील, सुनील शिंदे, सौरभ वायझाडे, गणेश गावंडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.