शेतकऱ्यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:13 AM2021-03-27T04:13:25+5:302021-03-27T04:13:25+5:30

फोटो पी २६ ब्राम्हणवाडा ब्राह्मणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटमुळे शेतकरी ...

Compensate the farmers through immediate panchnama | शेतकऱ्यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

शेतकऱ्यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

Next

फोटो पी २६ ब्राम्हणवाडा

ब्राह्मणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटमुळे शेतकरी वर्गाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजयुमोने केली आहे.

घाटलाडकी परिसरातसुद्धा या वादळ वाऱ्यामुळे, गारपीटमुळे शेतकरी वर्गाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तोंडाजवळ आलेला घास हिसकावून नेला आहे. गहू, चना, भाजीपाला, कांदा अशा विविध पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चांदूर बाजार तालुका सरचिटणीस दीक्षित खाजोने यांनी चांदूर बाजारच्या तहसीलदारांना त्याबाबत निवेदन दिले. यावेळी तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, सुनील कपले, अनिल तायडे, स्वप्नील गाडबैल, सागर शिरभाते उपस्थित होते.

पान ३

Web Title: Compensate the farmers through immediate panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.