अतिवृष्टीची ३ लाख ६६ हजार ९१६ शेतकऱ्यांना भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:15 AM2021-02-11T04:15:05+5:302021-02-11T04:15:05+5:30

अमरावती : गत हंगामात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार ९१६ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून ३३७ ...

Compensation to 3 lakh 66 thousand 916 farmers for excess rain | अतिवृष्टीची ३ लाख ६६ हजार ९१६ शेतकऱ्यांना भरपाई

अतिवृष्टीची ३ लाख ६६ हजार ९१६ शेतकऱ्यांना भरपाई

Next

अमरावती : गत हंगामात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार ९१६ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून ३३७ कोटी ६ लक्ष रुपयांचे अनुदान अदा करण्यात आले. पालकमंत्री शोमती ठाकूर यांनी याकरिता पाठपुरावा केला आहे.

जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक व फळबागांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तपशीलवार पंचनामे नोंदविण्याचे आदेश महसूल प्रशासनाला पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला होता. जिल्ह्यातील बाधित गावांची संख्या १९०३ व शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ६६ हजार ९१६ इतकी आहे. त्यानुसार जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १६८.५३ कोटी व दुसऱ्या टप्प्यात १६८.५३ कोटी अशी एकूण ३३७.०६ लक्ष रुपये अनुदान शासनाकडून वितरित करण्यात आले. त्यापैकी ३ लाख ३१ हजार ८९१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बॉक्स

अशी आहे मदत

अतिवृष्टी व पुरामुळे पीक व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. या बाधित शेतकऱ्यांना बागायती व सिंचनअंतर्गत प्रतिहेक्टरी १० हजार रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रुपये दराने दोन हेक्टरपर्यंत मदत शासनाने जाहीर केली. या मदतीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वीच जमा करण्यात आला. त्यानंतर दुसरा हप्ताही प्राप्त झाला.

Web Title: Compensation to 3 lakh 66 thousand 916 farmers for excess rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.