शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; खासदार नवनीत राणांची केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 05:04 PM2021-09-30T17:04:33+5:302021-09-30T17:26:06+5:30
अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर सिंह यांची भेट घेऊन केली.
अमरावती : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक पीकं पाण्याखाली गेले, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली.
विदर्भ, मराठवाड्यात सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. सोयाबीनला कोंब फुटले, कापसाची बोंडे सडली, तुरीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयात केल्याने सोयाबीनला फक्त चार ते पाच हजाराचा भाव मिळत आहे. केंद्र सरकारने फसल बीमा योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नवनीत राणा यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर सिंह यांची भेट घेऊन केली.
देशाचे कृषिमंत्री मा ना श्री नरेंद्रसिंग तोमर यांची कृषिभवन नवी दिल्ली यांच्या कार्यालयात भेट घेऊन सोयाबीन आयात रोकण्या संदर्भात मागणी केली आणि मोठया प्रमाणात मराठवाडा विदर्भात पावसामुळे झालेल्या नुस्काणीचे सरसकट प्रति हेक्टर 30 हजार रुपये नुस्कान भरपाई देण्यात यावी अशी मागणीकेली pic.twitter.com/2R8qArG8qs
— Navneet Ravi Rana (@navneetravirana) September 30, 2021
दरम्यान अतिवृष्टीमुळे विदर्क्ष मराठवाड्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून आता करावे तरी काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थिती त्यांना मदतीचा हात म्हणून सरकारने तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे.