विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पदासाठी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:26 PM2018-03-05T22:26:47+5:302018-03-05T22:26:47+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्याने परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळ संचालकपदासाठी एकूण १५ अर्ज प्राप्त झाले आहेत.

Competition for the post of Controller of Examinations in the University | विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पदासाठी स्पर्धा

विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पदासाठी स्पर्धा

Next
ठळक मुद्दे१५ उमेदवारांचे अर्ज : नागपूरकरांची वर्णी लागण्याचे संकेत

आॅनलाईन लोकमत
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्याने परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळ संचालकपदासाठी एकूण १५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापदासाठी नागपूरकर आघाडीवर आहेत. कुलगुरूनंतर परीक्षा नियंत्रक देखील नागपूरचे असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सामान्य प्रशासन विभागाकडे आलेल्या अर्जानुसार नाशिक येथील मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे, दारापूर येथील कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय खेरडे, हव्याप्र. मंडळाचे प्रभाकर रामटेके, अकोला येथील खंडेलवाल कॉलेजचे प्राचार्य जगदीश साबू, बडनेरा येथील प्रा.राम मेघे अभियांत्रिकीचे दिलीप इंगोले व गजेंद्र बमनोटे, विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व रंजन विभागाचे संचालक अविनाश असनारे, यवतमाळ येथील जगदंबा अभियांत्रिकीचे विजय नेवे, नागपूर येथील श्रीमती राधिकाबाई पांडव कॉलेज आॅफ इंजिनिरींचे प्रशांंत पाटील, विद्यापीठाचे माजी वित्त व लेखा अधिकारी आर.डी. सिकची, नागपूर व्हिएमव्हीचे अभय मुदगल, अमरावती येथील राजेंद्र गोडे इंन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीचे हेमंत देशमुख, सैयद मुजाहीद बाशीद, फातेमा तबस्सूम शेख रफीक, अनिता वानखडे हे १५ उमेदवार विद्यापीठात परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळ संचालकपदासाठी स्पर्धेत आहे. विद्यापीठाचे विद्यमान परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळाचे संचालक जयंत वडते हे जुलै २०१८ मध्ये पदमुक्त होणार आहे. ते विद्यापीठात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन संचालक पद भरतीची प्रक्रिया राबविली आहे. त्यानुसार १५ जणांचे अर्ज सामान्य प्रशासन विभागाकडे प्राप्त झाले आहे. तसेच नव्या विद्यापीठ कायद्यानुसार मान्यताप्राप्त नवोउपक्रम नवसंशोधन व सहचार्य संचालकपदासाठीसुद्धा १० अर्ज मिळाले आहे. विद्यापीठात कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव त्यानंतर परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन संचालक हेच पद महत्त्वाचे मानले जाते. मात्र, या पदावर कोण विराजमान होईल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Web Title: Competition for the post of Controller of Examinations in the University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.