‘त्या’ कंत्रादाराविरुद्ध तक्रार
By admin | Published: June 15, 2016 12:28 AM2016-06-15T00:28:05+5:302016-06-15T00:28:05+5:30
पुलाच्या खोदकामात पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. या पाईप लाईन दुरुस्तीसाठी जीवन प्राधिकरणाला अंदाजित ३ लाख ५० हजार खर्च येणार आहे.
अमरावती : पुलाच्या खोदकामात पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. या पाईप लाईन दुरुस्तीसाठी जीवन प्राधिकरणाला अंदाजित ३ लाख ५० हजार खर्च येणार आहे. १५ दिवस ओलांडूनही याबाबत अद्याप कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा नोंदवून संबधीतांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीची तक्रार महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. दरम्यान १६ व १७ जून रोजी या पाईप लाईनच्या दुरुस्तीचे कामकाज चालणार असल्यामुळे शहरातील काही ठिकाणचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेने गायत्री नगर, टेलीकॉम कॉलनी व टी.टी. नगरातील नाल्यावर सिमेंट क्रॉक्रिटच्या पुलांचे बांधकाम सुरु केले आहे. या पुलाच्या बांधकामाचा कंत्राट देण्यात आला असून त्या कामामुळे १७ मे रोजी ७०० मीमी व्यासाच्या क्रॉक्रिट प्रकारातील पाईप लाईन क्षतीग्रस्त झाली. कंत्रादराच्या निष्काळजीपणाने ही पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यातच जीवन प्राधीकरणाचे मोठे नुकसान झाले आहे. या पाईपलाईन दुरुस्तीसाठी साडेतील लाखांचा अंदाजित खर्च येणार आहे. हा खर्च देण्यासंबंधित जीवन प्राधिकरणाने संबधीतांशी पत्रव्यवहार केले आहेत.