‘त्या’ धान्यमालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:42 AM2018-01-26T00:42:35+5:302018-01-26T00:42:59+5:30

येथील पोलिसांनी १४ जानेवारी रात्री ९ वाजता १६ टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला होता. अखेर १० दिवसांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने धान्यमालकावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत ई.सी. अ‍ॅक्ट ३, ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

'That' the complainant filed a complaint | ‘त्या’ धान्यमालकावर गुन्हा दाखल

‘त्या’ धान्यमालकावर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देतांदूळ जप्ती प्रकरण : महसूल विभागाने आठ दिवसांनी सोपविला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : येथील पोलिसांनी १४ जानेवारी रात्री ९ वाजता १६ टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला होता. अखेर १० दिवसांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने धान्यमालकावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत ई.सी. अ‍ॅक्ट ३, ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रेशनच्या साठ्यातील हा तांदूळ असावा, असा संशय पोलिसांना होता. परंतु, त्यासाठी गुन्हा दाखल करताना महसूल विभागाचा अहवालाची आवश्यकता होती. या प्रकरणात महसूल विभागाकडून अहवालास विलंब झाल्याने गुन्हा दाखल नव्हता. ट्रक पकडल्यानंतर आठ दिवसांनी चौकशी अधिकारी भगत यांनी तहसीलदारामार्फत पोलीस विभागाला अहवाल सोपविला. ‘सदर तांदूळ रेशनचे असल्याचे दिसते; मात्र निश्चित सांगता येत नसल्याने पोलिसांनी त्यांच्या स्तरावर कार्यवाही करावी’ असे अहवालात नमूद आहे. पोलिसांनी जीवनावश्यक कायदा व सार्वजनिक साठवणूक व विक्री कायद्यांतर्गंत कलम ३ व ७ नुसार धान्यमालक बंडू अग्रवाल, ट्रकचालक मो.मिया बशीर मियाविरुद्ध गुन्हा नोंदवि आला. सदर १६ टन मालाची किंमत १८ लाख ५२ हजार इतकी दाखविण्यात आली आहे.
बाजार समितीची ना!
धान्यमालकाने अचलपूर बाजार समितीच्या आवारामधून तांदूळ खरेदी केल्याचे सांगितले होते. त्याने याबाबत कागदपत्रेही पोलिसांकडे सादर केली. तथापि, अचलपूर बाजार समितीच्या आवारात तांदूळ व साखर खरेदी-विक्री करण्यास बंदी असल्याचे संबंधित अधिकाºयांनी सांगितले. ट्रक सेस भरलेला नाही; अर्थात बाजार समितीच्या आवारातून हा माल गेलाच नाही, अशी माहितीही संबंधितांकडून पोलिसांना देण्यात आली.
 

Web Title: 'That' the complainant filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.