अॅपवर नोंदविता येणार स्वच्छतेविषयक तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:00 PM2018-11-28T23:00:03+5:302018-11-28T23:00:24+5:30
गटर साफ नाही, कचरा उचलला नाही यांसारख्या तक्रारी करण्यासाठी आता महापालिकेत जाण्याची गरज नाही, तर स्वत:च्या मोबाइलवर क्षणात याची तक्रार करता येणार आहे. नगर विकास विभागाने एमओएचयूए अॅप विकसित केले आहे. ही नागरिकांसाठी मोठी उपलब्धी आहे. ही केंद्र शासनाची प्रणाली असल्याने तक्रारीचा निपटारा विहित कालावधीत करणे प्रशासनाही बंधनकारक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गटर साफ नाही, कचरा उचलला नाही यांसारख्या तक्रारी करण्यासाठी आता महापालिकेत जाण्याची गरज नाही, तर स्वत:च्या मोबाइलवर क्षणात याची तक्रार करता येणार आहे. नगर विकास विभागाने एमओएचयूए अॅप विकसित केले आहे. ही नागरिकांसाठी मोठी उपलब्धी आहे. ही केंद्र शासनाची प्रणाली असल्याने तक्रारीचा निपटारा विहित कालावधीत करणे प्रशासनाही बंधनकारक आहे.
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची तेवढीच नागरिकांची आहे. गटार साफ नाही, कचरा उचलला नाही, सार्वजनिक शौचालय साफ नाही, अशा प्रकारच्या अनेक तक्रारींसाठी आता नागरिकांना महानगरपालिकेत जाण्याची गरज नाही. ही गैरसोय दूर होऊन तक्रार नोंदवणे आता अगदी सोपे झाले आहे. प्रत्येक नागरिक स्मार्ट फोनच्या साहाय्याने अगदी कुठूनही, क्षणार्धात विनासायास तक्रार नोंदवू शकतो.
महानगरपालिकेच्या संबंधित कार्यालयाकडे ही तक्रार जाईल आणि तेथून संबंधित क्षेत्राच्या जबाबदार कर्मचाऱ्याकडे तात्काळ पाठविली जाईल. तोच कर्मचारी तक्रार निवारण करून, तक्रार असलेल्या जागेचा फोटो काढेल व पोस्ट करेल आणि तो संबंधित नागरिकांससुद्धा तात्काळ दिसेल. नागरिकांच्या स्वच्छतेच्या संदर्भातील तक्रारींचा निपटारा स्वच्छता अॅपद्वारे होऊ शकणार असल्याने शहर स्वच्छतेबाबत ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. हे अॅप डाऊनलोड करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
अशी करता येईल तक्रार
केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने स्वच्छता एम.ओ.एच.यू.ए. अॅप विकसित केले आहे, जे वापरण्यास अगदी सुलभ आहे. मोबाइलमधील प्ले स्टोअरवर क्लिक करून स्वच्छता एम.ओ.एच.यू.ए. अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर पसंतीची भाषा निवडून अॅप आपला मोबाइल नंबर मागेल त्या योग्य जागी नमूद करा. तुम्हाला लगेच ओ.टी.पी. मिळेल. त्यानंतर पहिली तक्रार पोस्ट करा व क्लिक करा.
अस्वच्छतेचा फोटोही पाठविता येणार
अस्वच्छतेबाबत जी तक्रार नोंदवायची आहे, त्या जागेचा फोटो काढा. सर्वसाधारणपणे आढळणाºया तक्रारी, जसे मृत प्राणी, कचºयाचा ढीग, कचरागाडी आली नाही, यातील जी तक्रार लागू असेल, त्यावर क्लिक करा. नंतर त्या परिसरातील स्थळ व क्लिक करा.
नागरिकांनी जास्तीत जास्त स्वच्छता एम.ओ.एच.यू.ए. अॅप डाऊनलोड करून रजिस्ट्रेशन करा. तक्रारीवर समाधान झाल्यास लाईक करा. स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी व्हावे.
- संजय निपाणे, आयुक्त, महापालिका