‘त्या’ प्रकरणाची तक्रार गृहराज्यमंत्र्यांकडे
By admin | Published: August 25, 2016 12:10 AM2016-08-25T00:10:11+5:302016-08-25T00:10:11+5:30
काली- पिवळीच्या चालकाला बेदम मारहाण करणे दर्यापूर वाहतूक पोलिसांना चांगलेच महागात पडणार आहे.
वाहन चालकाला मारहाण प्रकरण : चौकशीचा अहवाल केव्हा ?
अमरावती: काली- पिवळीच्या चालकाला बेदम मारहाण करणे दर्यापूर वाहतूक पोलिसांना चांगलेच महागात पडणार आहे. या प्रकरणाची तक्रार फिर्यादीने वकीलामार्फत गृहराज्यमंत्री रणजित पाटील व जिल्हा पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांच्याकडे तक्रार केली आहे.
प्रकरणातील काली- पिवळीच्या वाहन चालक संतोष टोळे याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी त्याला डिस्चार्ज मिळाला.
मागील आठवडयात गुरुवारी दर्यापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत तीन वाहतूक पोलिसांनी येथीलच काली- पिवळीच्या चालकाला पैसे न दिल्यामुळे बेदम मारहाण केली होतीे. या प्रकारानंतर निराशा येवून वाहन चालक संतोष टोळे याने विष प्राशन केले होते. त्याला तातडीने सामान्य रुग्णांलयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती स्थिर असल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, मारहाण करणारे पोलीस अद्यापही मोकाटच आहेत. अंजनगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवतारे यांना जिल्हा पोलीस अधिक्षकांनी चौकशीचे आदेश देवून कारवाईचा अहवाल मागितला मात्र अद्याप हा अहवाल सादर झाला नसल्याचे माहिती याप्रकरणी वाहतूक पोलिसांना वाचविण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप केल्या जात आहे. काली- पिवळीचा चालका दारु पिऊन होता. त्यानेच आपणास अश्लील शिवीगाळ केली असे येथील वाहतूक पोलिसांनी आपल्या बयाणात नोंदविले आहे. चालकाचा दोष नसतांना व प्रकरणी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली नसताना वाहतूक पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
निरपराध वाहन चालकाला बेदम मारहाण करणाऱ्या 'त्या' वाहतूक पोलिसांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी वाहन चालक संतोष टोळे याच्या परिवाराने केली आहे. मात्र, तक्रारीवर दर्यापूर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप टोळे परिवाराने केला आहे. (प्रतिनिधी)