गुडेवारांविरुद्धची तक्रार विभागीय आयुक्तांकडे

By admin | Published: March 2, 2016 12:54 AM2016-03-02T00:54:22+5:302016-03-02T00:54:22+5:30

अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करीत प्रकल्प अधिकारी वंदना गुल्हाने यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार

Complaint against Gudewar to the Departmental Commissioner | गुडेवारांविरुद्धची तक्रार विभागीय आयुक्तांकडे

गुडेवारांविरुद्धची तक्रार विभागीय आयुक्तांकडे

Next

‘विशाखा’द्वारे चौकशी : अपमानास्पद वागणूक
अमरावती : अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करीत प्रकल्प अधिकारी वंदना गुल्हाने यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याविरुध्द शनिवारी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. ही तक्रार परवानगीसाठी पोलीस आयुक्त मंडलिक यांच्याकडे व पोलीस आयुक्तांकडून विभागीय आयुक्त कार्यालयातील विशाखा समितीकडे पाठविण्यात आली आहे.
शुक्रवारी महापालिकेतील प्रकल्प योजना अधिकारी वंदना गुल्हाने प्रशासकीय कामानिमित्त आयुक्तांच्या कक्षात गेल्या असता आयुक्तांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा त्यांचा आरोप आहे. गुल्हाने यांनी शनिवारी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हे प्रकरण पोलिसांनी परवानगीकरिता पोलीस आयुक्तांकडे पाठविले. पोलीस आयुक्तांनी तक्रार विभागीय आयुक्त राजूरकर यांच्याकडे पाठविली. आता विभागीय आयुक्त कार्यालयातील विशाखा समितीद्वारे या प्रकरणाची चौकशी होण्याचे संकेत आहेत. महापालिका आयुक्तांविरुध्द तक्रार प्राप्त झाली होती. महिलेशी संबंधित प्रकरण असल्याने उच्च न्यायालयाच्या गाईडलाईनप्रमाणे ती तक्रार विशाखा समितीकडे पाठविल्याचे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

Web Title: Complaint against Gudewar to the Departmental Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.