कुत्तरमारे यांच्याविरूद्ध अॅट्रॉसिटीची तक्रार खोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:06 PM2019-01-29T23:06:46+5:302019-01-29T23:07:11+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकप्रमुख यांच्या विरोधात अतिक्रमणधारक गोपाल चव्हाण यांनी दिलेली तक्रार खोटी आहे. पोलिसांनी शहानिशा न करता व वस्तुस्थिती जाणून न घेता खोटा गुन्हा दाखल केल्याने तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी महापालिका कर्मचारी, कामगार संघाद्वारा मंगळवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख व पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांना निवेदनाद्वारे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकप्रमुख यांच्या विरोधात अतिक्रमणधारक गोपाल चव्हाण यांनी दिलेली तक्रार खोटी आहे. पोलिसांनी शहानिशा न करता व वस्तुस्थिती जाणून न घेता खोटा गुन्हा दाखल केल्याने तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी महापालिका कर्मचारी, कामगार संघाद्वारा मंगळवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख व पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांना निवेदनाद्वारे केली.
गाडगेनगर पोलिसांद्वारा वस्तुस्थिती जाणून न घेता अॅट्रासिटी सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद केली. ही कामकाजाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्याचा थेट परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आमही सोमवारी दुपारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याचे संघटनेद्वारा निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यामध्ये मध्यस्ती करून कर्मचाºयांना यथायोग्य संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कुत्तरमारे यांच्यावर दाखल गुन्हे त्वरित मागे घ्यावे, यासाठी वरिष्ठ अधिकाºयांशी प्रशासकीय स्तरावर चर्चा करून वस्तुस्थिती जाणूनच कारवाई करावी, अन्यथा कर्मचाºयांचे मनोधर्य खच्ची होऊन याचवा महापालिकेच्या कामकाजावर अनिष्ट परिणाम झाल्यास कर्मचारी जबाबदार राहणार नसल्याचे संघटनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले. यावेळी अध्यक्ष रमेश पांडे, कार्याध्यक्ष मानविराज दंदे, सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल याांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कुत्तरमारेंना सहकार्य करणाºयांवर कारवाई करा
पत्रपरिषद : आदिवासी, पारधी विकास परिषदेची मागणी
अमरावती : अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला असतानाही त्यांना अटक न करणाºया पोलीस अधिकाºयांवर अनुसूचित जाती, जमाती हक्क व न्याय संरक्षण कायद्याच्या ३६६ चे पोटकलम ४ अन्वये कारवाई करण्याची मागणी आदिवासी पारधी विकास परिषदेचे ेप्रदेशाध्यक्ष कृष्णराव चव्हाण यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केली.
कुत्तरमारे यांनी अनेकदा गोपाल चव्हाण यांचे अतिक्रमण काढले. विनंती केली असता, जातिवाचक शिविगाळ केली. त्यामुळे ९ जानेवारीला गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ५ फेब्रुवारीपर्यत न्याय न मिळाल्यास राज्याच्या २८ जिल्ह्यांत धरणे व मोर्चे काढण्यात येईल, असे सुखदेवराव सोळंके, निशा चव्हाण म्हणाले.
कारवाई सुरू असताना कुत्तरमारे विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीत उपस्थित होते. यांसह अनेक मुद्द्यांवर पत्रपरिषद यासाठी नसल्याचे सांगत सारवासारव करण्यात आली.