समाज कल्याणमध्ये पुस्तक खरेदीची सीईओंकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:30 AM2020-12-15T04:30:41+5:302020-12-15T04:30:41+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून वाचनालयासाठी प्रत्येक ७५ विविध स्पर्धात्मक पुस्तके घेण्याबाबतचा ठराव समितीने पारित केला असताना, ...
अमरावती : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून वाचनालयासाठी प्रत्येक ७५ विविध स्पर्धात्मक पुस्तके घेण्याबाबतचा ठराव समितीने पारित केला असताना, यामध्ये केवळ ३५ पुस्तकेच पुरविण्याचा घाट प्रशासकीय यंत्रणेने रचला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार १४ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी समाजकल्याण समितीने समाजकल्याण विभागाकडून प्रत्येक वाचनालयाला प्रत्यके ७५ स्पर्धात्मक परीक्षेचे पुस्तके खरेदीचा ठराव पारित केला होता. मात्र, याकरिता निविदा प्रक्रिया राबविताना प्रत्यक्षात ३५ पुस्तकांच्या खरेदीचा घाट रचण्यात आला. हा प्रकार समिती सदस्यांच्या निदर्शनास येतात. समितीचा ठराव कुणी बदलविला, टेंडरमधील अटीमध्ये पुस्तकाचा नमुना संबंधित विभागात जमा करण्यात आले, याशिवाय अन्य बाबी संशयास्पद असल्याचे तक्रारदार सदस्य शरद मोहोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
कोट
समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना समितीने ठरविल्याप्रमाणेच कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यात कुठल्याही प्रकारे चुकीचे काम होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
- दयाराम काळे, सभापती, समाज कल्याण समिती