अचलपूर एसडीओंच्या विरोधात आयुक्तांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:11 AM2021-09-25T04:11:57+5:302021-09-25T04:11:57+5:30
अनिल कडू परतवाडा : अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्याविरुद्ध टपालपुरावाशीयांनी विभागीय आयुक्तांकडे मानवी हक्क संघटनेद्वारा १७ सप्टेंबर रोजी ...
अनिल कडू
परतवाडा : अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्याविरुद्ध टपालपुरावाशीयांनी विभागीय आयुक्तांकडे मानवी हक्क संघटनेद्वारा १७ सप्टेंबर रोजी तक्रार दिली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून निलंबित करा. त्यांचेवर ॲट्रॉसिटी लावण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तसे न झाल्यास २ ऑक्टोबरपासून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयापुढे आमरण उपोषणाचा इशाराही तक्रारकर्त्यांनी दिला आहे.
तक्रारीवर मानव हक्क संघटना अचलपूरचे संस्थापक अध्यक्ष तुळशीराम धुर्वे यांची स्वाक्षरी आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनाही देण्यात आल्या आहेत. परतवाडा शहरातील टपालपुरा नामक वस्ती शंभर वर्षांपूर्वीची आहे. तेथे दलित व आदिवासींचे वास्तव्यास आहे. येथील झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमित नियमाकुल करण्याकरिता अनेक दिवसांपासून प्रशासनाला साकडे घालत आहे. अचलपूर नगरपरिषदेकडेही त्यांनी निवेदन देऊन मागणीचा पाठपुरावा केला. उपविभागीय अधिकारी अचलपूर यांनाही त्यांनी निवेदन दिलेत. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर दोन वर्षात टपालपुरावासीयांनी चारवेळा उपोषण व धरणे आंदोलनही केले.
बॉक्स
एसडीओ म्हणतात, राष्ट्रीय महामार्ग
टपालपुरावासीयांचे अतिक्रमित नियमाकुल करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव सादर केला गेला. यावर २६ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. टपालपुरा वस्तीसमोरून जाणारा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी कळविल्याने हा प्रस्ताव बैठकीत प्रलंबित ठेवला गेला.
तो राष्ट्रीय महामार्ग नाही
टपालपुरा वस्तीजवळून जाणारा मार्ग राष्ट्रीय महामार्ग नसल्याचा अधिकृत दस्तऐवज टपालपुरावासीयांनी सादर केला आहे. धामणगावगढी ते परतवाडा हा राज्य मार्ग आहे. परतवाडा धारणी रोडकरिता वळण मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते विकास योजनेत समाविष्ट आहे. त्या रस्त्याचे नाव अचलपूर परतवाडा शहराबाहेरील वळण रस्ता असे आहे.
कोट
टपालपुरावस्तीजवळून जाणाऱ्या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गाशी काहीही संबंध नाही. उपविभागीय कार्यालयाने विनाकारण राष्ट्रीय महामार्गाची त्रुटी टाकली.
- तुळशीराम धुर्वे, अध्यक्ष, मानव हक्क संघटना अचलपूर
कोट
धुर्वे यांच्या निवेदनातील मुद्द्यावर नियमानुसार कार्यवाही करून प्रकरणाचा निपटारा करण्याचे निर्देश अचलपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.
- संदीपकुमार अपार, एसडीओ अचलपूर