वित्त विभागाच्या मनमानी कारभाराची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 09:54 PM2018-09-17T21:54:57+5:302018-09-17T21:56:01+5:30

जिल्हा परिषद अध्यक्षांनी बोलाविलेल्या १४ सप्टेंबर बैठकीत मुख्यलेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले हे अनुउपस्थितीत राहिल्याने ही सोमवारी बोलविली होती.तसेच पत्रही वित्त अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, या दोन्ही बैठकीत ते उपस्थित नव्हते. त्यामुळे अध्यक्षांच्या पत्राला केराची टोपली दाखविणाऱ्या वित्त विभागातील मनमानी कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार १७ सप्टेंबर रोजी झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणेंसह पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली.

Complaint to the departmental commissioner of the arbitrariness department of Finance Department | वित्त विभागाच्या मनमानी कारभाराची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

वित्त विभागाच्या मनमानी कारभाराची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा आक्षेप, आढावा बैठकीला दांडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद अध्यक्षांनी बोलाविलेल्या १४ सप्टेंबर बैठकीत मुख्यलेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले हे अनुउपस्थितीत राहिल्याने ही सोमवारी बोलविली होती.तसेच पत्रही वित्त अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, या दोन्ही बैठकीत ते उपस्थित नव्हते. त्यामुळे अध्यक्षांच्या पत्राला केराची टोपली दाखविणाऱ्या वित्त विभागातील मनमानी कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार १७ सप्टेंबर रोजी झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणेंसह पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली.
१४ सप्टेंबरच्या सभेला कॅफो आजारी रजेवर होते. त्यामुळे ही बैठक पुन्हा सोमवारी घेण्याबाबतचे पत्र १४ सप्टेंबरला वित्त विभागाला दिले होते. नियोजित बैठकीला अध्यक्ष पोहोचले. मात्र, कॅफो येवले हे अचानक दौºयावर निघून गेले. त्यामुळे अध्यक्षांनी भ्रमनध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी मला उर्मट उत्तर दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. वित्त विभागाशी संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने ही बैठक बोलविली होती. मात्र, जबाबदार अधिकारीच नसल्याने ही सभा बारगळली. वित्त विभागाच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
काय आहेत तक्रारीत मुद्दे
कॅफोकडे कुठलीही नस्ती गेल्यास त्यांची आवक-जावकमध्ये नोंद होत नाही. त्रुटीची पूर्तता करून त्या सात दिवसांत निकाली न काढता त्या फायली महिनोगिणती धूळखात पडून राहतात. दरमहा विभागनिहाय योजनावरील तरतूद, शिल्लक रक्कम, चालू व गतवर्षाच्या खर्चाचा आढावा वित्त विभागाकडून घेतला जात नाही. मासिक खर्चाचा अहवाल विषय समिती, स्थायी समिती व आमसभेत ठेवला जात नाही. विभागनिहाय लेखा आक्षेप निकाली काढण्यासाठी खातेप्रमुखांची बैठक घेऊन अनुपाल केले जात नाही.व महत्वाचे लेखा आक्षेप तपासले जात नाहीत. मागील वर्षीचा खर्च तपासून खाते निहाय व पंचायत समिती निहाय शिल्लक रक्कम व चालू तरतूद बाबत आगामी लोकसभा,विधानसभेची निवडणूकीची आचारसंहीता लक्षात घेता. पुरवणी अर्थसंकल्प तयार करून मान्यतेसाठी विषय समिती,स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत ठेवला नाही.कुठल्याही कामांची देयके अदा करतांना सर्व कागदपत्रांची तपासणी केली जात नाही असे जवळपास दहा मुद्याचा यातक्रारीत समावेश आहे.या पत्रावर अध्यक्ष नितीन गोंडाणे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे,सभापती बळवंत वानखडे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पहिल्या बैठकीला आजारी रजेवर होतो. सोमवारी नियोजित तिवसा दौºयावर होतो. सहकाऱ्यांना बैठकीची माहिती दिली होती. नियमानुसार कामे न केल्याने राजकीय दबाव आणून बदनामीचे हे षड्यंत्र आहे. धमक्या दिल्याचे पुरावे आहेत.
- रवींद्र येवले, कॅफो, जि.प.

वित्त अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक फायली रोखल्या जातात. यासंदर्भात ही बैठक बोलविली होती. या दोन्ही बैठकीला कॅफो गैरहजर होते. त्यामुळे या विभागाच्या चौकशीसाठीची तक्रार आयुक्तांकडे केली आहे. केलेले आरोपात तथ्यहीन आहे.
- नितीन गोंडाणे, अध्यक्ष, जि.प.

Web Title: Complaint to the departmental commissioner of the arbitrariness department of Finance Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.