एमआरइजीएसमध्ये अपहाराची जिल्हाधिकाºयांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:13 AM2021-02-15T04:13:15+5:302021-02-15T04:13:15+5:30
मोर्शी : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्ता दुतर्फा वृक्षलागवडीत ग्रामरोजगार सेवकाने कामावर नसलेल्या लोकांची नावे मस्टरवर ...
मोर्शी : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्ता दुतर्फा वृक्षलागवडीत ग्रामरोजगार सेवकाने कामावर नसलेल्या लोकांची नावे मस्टरवर दाखवून परस्पर पैसे काढून अपहार केल्याची तक्रार दिवाकर पाचारे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
ग्रामपंचायत हिवरखेड येथील ग्रामरोजगार सेवक शेख शकील शेख नूर यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या वृक्षलागवडीच्या कामात स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तीचे नावे मस्टरमध्ये टाकून मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा आरोपदेखील करण्यात आला. उमरखेड तथा हिवरखेड येथील सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र कामावर सुखदेव नागले, गुरू पदनाम, विनोद सावरकर, रामदास वानखडे, छाया सावरकर, किसन श्रीवास, उमेश राऊत, खुशाल मेश्राम, अविनाश वानखडे, रवींद्र गुल्हाने, सुभाष घोरपडे, श्यामराव धुर्वे, योगेश पलघामोल, साहेबराव पलघामोल, रवि खमरे ही एकूण १७ मजूर कामावर सुरू आहे. याव्यतिरिक्त ११ मजूर कामावर नसताना त्यांची नावे मस्टरवर दाखवून शासनाच्या पैशाचा अपहार करीत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी दिवाकर पाचारे यांनी एका निवेदनातून केली आहे.